Daily Mahasatta

Daily Mahasatta

वापरलेले पीपीई कीट रस्त्यावर टाकले, नागरिकांतून नाराजी

पेठ (रियाज मुल्ला )
        पुणे-बेंगलोर महामार्गावर नेर्ले जवळ अज्ञाताने कोरोना ग्रस्तांना वापरले जाणारे पीपी ई किट रस्त्यावर फेकून दिल्यामुळे वाहनधारकांची भंबेरी उडाली व राग व्यक्त झाला.
            वाळवा तालुक्यात कोरोनाचा प्रसार वाढत असतानाच महामार्गावर हे किट पडल्यामुळे लोकांच्यात भीती निर्माण झाली आहे. आज दुपारी हे किट पडल्याचे निदर्शनास आले. पुणे बेंगलोर महामार्गावर इस्लामपूर, कोल्हापूर, आणि कराड या ठिकाणी कोरोनावर उपचारासाठी विविध रुग्णालय आहेत. तर सांगली आणि सातारा या ठिकाणी शासकीय रुग्णालय उभे केलेले आहेत. तर काही गावांमध्ये केअर सेंटर लोकांच्या सहकार्यातून उभी होत आहेत. एकीकडे डॉक्टर व प्रशासन पूरग्रस्तांसाठी आपला जीव धोक्यात घालून लोकांची सेवा करत असताना दिसून येत असतानाच असे पी पी ई किट अशा पद्धतीने काही विघ्नसंतोषी लोक रस्त्यावरती फेकून देत आहेत.
समाज कंठक समाजाचा विचार करत नसल्याचे चित्र आहे. 
        याबाबत कामेरीचे दिलीप क्षीरसागर यांनी आधार फाउंडेशन चे अध्यक्ष विजय लोहार यांना याबाबत कल्पना दिली.यावेळी संतोष खरमाटे, विशाल पाटील हे घटनास्थळी पोहोचले. रस्त्यावरती पडलेले ते पी पी इ कीट काठीच्या साह्याने बाजूला घेऊन ते जाळून नष्ट केले. यावेळी या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. लोकांनी असं बेफिकिरीने वागू नये. दुसऱ्याची काळजी घ्या अशी भावना आधार फाउंडेशन चे अध्यक्ष विजय लोहार यांनी व्यक्त केली. यावेळी एकता फाउंडेशनचे संतोष खरमाटे,विशाल पाटील,राजकुमार कुंभार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments