Daily Mahasatta

Daily Mahasatta

मराठा आरक्षणासाठी संग्रामभाऊ- जितेश भैय्या एकत्र

 कडेगाव : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि युवा नेते जितेश कदम एकत्र आले.

नेर्ली/ कडेगाव (संदीप कुलकर्णी )
         मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज कडेगाव तहसीलदार कार्यालय समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, युवा नेते जितेश कदम यांच्यासह सर्व पक्षी नेते राजकीय मतभेद विसरून एकजुटीने उपस्थित होते.
            आंदोलनाचे नियोजन कडेगाव तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांकडून करण्यात आले होते. यावेळी संग्रामसिंह भाऊ देशमुख, जितेश भैया कदम राजाराम गरुड, जगदीश महाडिक, मंदाताई करंडे, इंद्रजीत साळुंखे, अॕड. प्रमोद पाटील तसेच इतर राजकीय मान्यवर उपस्थित होते. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सकल मराठा भगिनींच्या हस्ते तहसीलदार डॉक्टर शैलजा पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अनेक मराठा भगिनी तसेच बांधवांनी भावना व्यक्त केल्या.
           यावेळी जितेश भैया कदम म्हणाले, मराठा समाज आरक्षणासाठी सर्व राजकारण बाजूला ठेवून आपण हवी ती मदत करायला कटिबद्ध आहोत. ज्या मराठा समाजाच्या बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले त्यांचे बलिदान वाया जाता कामा नये असे मत जितेश भैया कदम यांनी व्यक्त केले. तसेच संग्रामसिंह देशमुख भाऊ यांनी मनोगत व्यक्त करताना आरक्षण कसे मिळवता येईल याचे मार्गदर्शन केले. जोपर्यंत आरक्षण निर्णय होत नाही तोपर्यंत सर्व प्रकारची भरती प्रक्रिया स्थगित करावी अशी मागणी त्यांनी सकल मराठा समाज यांच्या वतीने केली. आंदोलन करताना कोणतेही शासन निर्णयाचा पायमल्ली होऊ नये याची संपूर्ण जबाबदारी सकल मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने घेण्यात आली. यावेळी एक मराठा लाख मराठा या घोषणेचा एल्गार करण्यात आला. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आता शांत बसणार नाही. गरज पडली तर यापेक्षाही आक्रमक मोर्चा काढण्यात येईल असे सकल मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने सांगण्यात आले

Post a Comment

0 Comments