Daily Mahasatta

Daily Mahasatta

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर... विट्याचे आदर्श संकुल जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना देणार मोफत ' ऑनलाईन शिक्षण '


: इझी टेस्ट ॲपच्या  सहकार्याने सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना १० चे शिक्षण मिळणार मोफत, आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी  जितेंद्र डूडी यांच्या उपस्थितीत शुभारंभ 

सांगली (राजेंद्र काळे)
          विटा येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाने गेली 19 वर्ष 100% निकालाची यशस्वी परंपरा राखत शिक्षणाचा ' आदर्श पॅटर्न ' निर्माण केला आहे. हा आदर्श पॅटर्न आता सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहे. इझी टेस्ट ॲपच्या सहकार्याने सांगली जिल्ह्यातील विविध भागातील विद्यार्थ्यांना १० वी चे शिक्षण ऑनलाईन दिले जाणार आहे. त्यामुळे लाॅकडाऊनच्या काळात खासगी क्लासेस ऐवजी सर्व विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळणार आहे.
        संस्थेचे अध्यक्ष अॅड वैभव दादा पाटील म्हणाले, कोरोनाच्या महामारीमुळे अजूनही  शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी व पालक चिंतेत आहेत. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे.  या पार्श्वभूमीवर विट्यातील आदर्श संकुलामधील  मुख्याध्यापक,  शिक्षक यांच्या माध्यमातून इयत्ता दहावीच्या सर्व विषयाचे मोफत ऑनलाईन क्लास घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
           आदर्श संकुलातील माध्यमिक शाळांची गुणवत्ता वाखाणण्यासारखी आहे. गेली 19 वर्षे संस्थेच्या शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागत असून येथील विद्यार्थी गुणवत्तेमध्ये तालुक्यात चमकत आहेत. या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना व्हावा, या हेतूने आणि सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम आमच्या संकुलने हाती घेतला आहे. याचा लाभ ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मा वैभव पाटील यांनी केले आहे. इझी टेस्ट ॲप यांच्या तांत्रिक सहकार्याने हे क्लास दिनांक 9 सप्टेंबर पासून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जितेंद्र डूडी, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर गुडेवार व  माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग साहेब यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन होणार आहे.
....................................

आदर्श पॅटर्नचा जिल्हयातील
विद्यार्थ्यांना लाभ होणार..
         आदर्श संकुलच्या माध्यमिक विद्यालयाने गेली सलग १९ वर्ष १०० टक्के यशाची परंपरा राखली आहे. पाचवी पासूनच कोणत्याही प्रकारची खासगी शिकवणी न लावता विद्यार्थ्यांची शाळेत पूर्ण तयारी करुन घेण्यात येते. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणातून ' आदर्श ' पॅटर्न निर्माण झाला आहे. ऑनलाईन शिक्षणातून जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना हा आदर्श पॅटर्न अनुभवता येणार आहे.
           सुभाष धनवडे,
           मुख्याध्यापक, आदर्श संकुल विटा.

 

Post a Comment

0 Comments