Daily Mahasatta

Daily Mahasatta

आटपाडीच्या बाळेवाडीत जुळ्या भावांचा बुडून मृत्यू

आटपाडी (प्रतिनिधी)
         आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी या गावात मेंढया चरण्यासाठी गेलेल्या दोन जुळ्या भावांचा तलावाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला आहे. लव कोळेकर आणि अंकुश कोळेकर (दोघांचे वय -९) अशी त्यांची नावे आहेत.हे दोन्ही भाऊ उत्कृष्ट कबड्डी खेळाडू होते.
        याबाबत अधिक माहिती अशी आटपाडी तालुक्यातील या बाळेवाडी गावच्या हैबतराव कोळेकर यांना लव आणि अंकुश ही जुळी मुले होती.काल गुरुवार ता. १० रोजी ही दोन्ही मुले मेंढ्या राखण्यासाठी बाळेवाडी येथील माळ रानात गेली होती. गेल्या काही दिवसातील मुसळधार पावसामुळे बाळेवाडीतील बंधारे आणि तलाव वाहत आहेत. मेंढ्या चरत असताना यापैकी एकजण खेळत खेळत तलावाच्या पाण्यात गेला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागताच दुसरा भाऊ देखील त्याला वाचविण्यासाठी पाण्यात गेला. यावेळी गाळात रुतल्यामुळे दोन्ही भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

Post a Comment

0 Comments