बलात्कार प्रकरणी पोलिस निरिक्षक विपिन हसबनिस निलंबित


: महाराष्ट्राचे कृषी राज्यमंत्री मा. विश्वजीत कदम यांची माहिती

कडेगाव , (सचिन मोहिते )
        स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मदत करेन, असे सांगत बंगल्यावर नेऊन वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी दिनांक २८ ऑगस्ट २०२० रोजी  कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस याच्यावर कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असुन   पोलीस निरीक्षक हसबनीस यास निलंबित केले आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे कृषी राज्यमंत्री मा. विश्वजीत कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली . याबाबत पीडित  २८ वर्षीय मुलीने कडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे.
     याबाबत अधिक माहिती अशी पिडित मुलगी व तिची आजी कासेगाव बस थांब्याजवळ थांबलेले असताना  कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हसबनिस यांनी  पिडीत मुलीस कासेगाव बस स्थानकाजवळ कोठे जाणार आहेत?  असे विचारूण मदत करण्याचे हेतुने लॉकडाऊन काळात तुम्हाला वाहन मिळणार नाही, तुम्हाला मी कराडला सोडतो असे सांगून ओळख करून घेतली. त्यानंतर कराड येथे सोडेपर्यंत फिर्यादिची सर्व माहिती घेऊन मदत करण्याच्या बहाण्याने संबंधित तरुणीचा मोबाईल नंबर घेतला. माझी पत्नी एमपीएससी व यूपीएससी स्पर्धा परीक्षेची मार्गदर्शक असून ती तुम्हाला मार्गदर्शन करेल असे सांगून कडेगाव येथील बंगल्यावर संबंधित तरुणीला बोलावून घेतले व वारंवार बलात्कार केला. बलात्कार बाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास आत्महत्या करेन अशी धमकी पोलीस निरीक्षक हसबनिस यांने दिली होती. एवढ्यावरच न थांबता हसबनिस याने पोलिस ठाण्यातील सहकाऱ्यांना पिडित मुलगी हि आपली भाची असल्याचे सांगितले होते . गुन्हा नोंद झालेपासुन विपिन हसबनिस हा फरारीच आहे. अखेर त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.


 

Post a comment

0 Comments