Daily Mahasatta

Daily Mahasatta

म्हैसाळ विस्तारीत योजना व संख मध्यम प्रकल्पातील तलाव भरण्यासाठी जनजागृती करणार : प्रकाश जमदाडे

जत (प्रतिनिधी)
         : म्हैसाळ विस्तारीत योजना व संख मध्यम प्रकल्पातील तलाव भरण्यासाठी २ आॅक्टोंबर पासुन जनजागृती करणार असल्याची माहिती बाजार समितीचे माजी सभापती तथा केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
         जमदाडे म्हणाले , म्हैसाळ योजना निधी अभावी आजही पुर्ण झाली नाही. योजना पुर्ण झाली तरीही ४८ गावे पूर्णत: व १७ गावे अशंत: अशी ६५ गावे पाण्यापासुन वंचित राहणार आहेत. यासाठी मार्च २०१९ मध्ये विस्तारीत योजना महाराष्ट्र शासनास सादर केली होती. तत्कालीन सरकारने योजनेस तत्वतः मान्यता दिली होती. मात्र पुढे कार्यवाही झालेली नाही.
         ते म्हणाले, गेल्या दिड वर्षापासुन सतत या योजनेचा पाठपुरावा करीत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री जयंत पाटील तसेच खा.संजयकाका पाटील यांना निवेदन देऊन व प्रत्यक्ष भेटुनही योजना मंजुरिविषयी विनंती केली आहे.१जानेवारी २०२० रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले होते. कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातुन मुख्य कॅनॉल व्हसपेठ येथुन संख तलाव भरण्यासाठी ढोबळ अंदाजपत्रक महामंडळाकडे सादर केले आहे. यातून व्हसपेठ, गुड्डापुर. आसंगी (जत), दरीबडची सिध्दनाथ आदी साठवण तलाव तर माडग्याळ, अंकलगी, सोरडी व गोंधळेवाडी इत्यादी ओढापात्रातून पाणी सोडण्याची तरतुद केली आहे.        संख मध्यम प्रकल्पसुद्धा भरण्यासाठीची तरतुद ही १९९५ च्या मुळ योजनेत आहे.  विस्तारित योजनेतुन ५०००० एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.योजनेसाठी दिड वर्षापासुन पाठपुरावा करत असुन आता निर्णायक लढयासाठी महात्मा गांधी जयंतीदिनापासून ६५ गावात जावुन सर्व ग्रामपंचायतचे ठराव ,तसेच सर्व पक्षाचे विविध क्षेत्रातील पदाधिकारी, सर्व संस्थेचे पदाधिकारी यांची विनंती पत्रे घेऊन पालकमंत्री जयंत पाटील, व खा. संजयकाका पाटील यांना ही योजना मंजुर करुन दुष्काळ कायमचा संपवावा अशी विनंती करणार आहे. तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, पाणी संघर्ष समिती उमदी व शेतकरी बंधूंना सोबत घेऊन वंचित गावांच्या पाण्यासाठी निर्णायक लढा देणार आहे.तरी तालुक्यातील जनतेने ह्या लढ्यासाठी साथ द्यावी असे आव्हान प्रकाश जमदाडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments