Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोरोना : होम आयसोलेशन मध्ये काय घ्यावी काळजी : डॉ अभिजीत निकम यांचा अभ्यासपूर्ण लेख


विटा (प्रतिनिधी)
  अँटीजेन किंवा rt-pcr पॉझिटीव्ह आल्यानंतर सध्या 70 ते 80 टक्के लोक होम आयसोलेशन  मध्ये राहतात तर H.I.मध्ये राहताना मॉनिटरिंग काय करावे, सिटीस्कॅन गरज पडल्यास कधी करावा,  ऍडमिट कधी होण्याची गरज आहे हे माहीत असणे महत्त्वाच आहे... बऱ्याच वेळा मला काय लक्षण नाही.. मला काही त्रास नाही म्हणून दुर्लक्ष होते.. अचानक spo2 कमी झालेला असतोय अशावेळी ऍडमिट करावे लागते.

माॅनिटरिंग काय करावे =

 या आजारांमध्ये ऑक्सिजन लेवल महत्त्वाची आहे तसेच 14 दिवस लक्षणांवर लक्ष ठेवायला हवे. दम लागणे, छातीत दुखणे यावर  लक्ष ठेवायला हवे. पल्स आॅक्सिमिटरवर Spo2 मोजत रहावा. ताप 3-4 दिवसात कमी झाला तरीही पूर्ण चौदा दिवस पूर्ण होईपर्यंत दम व Spo2 वर लक्ष ठेवायलाच हवे. दिवसातून दोन- तीन  वेळा Six Minute Walk Test करावी. घरातल्या घरात सहा मिनिटे सामान्य गतीने चालावे व सहा मिनिटे पूर्ण झाल्यानंतर पल्स अॉक्सिमिटरवर Spo2 मोजावा. तो 94 पेक्षा जास्त असणे हे अपेक्षित असते. जोपर्यंत पल्स आॅक्सिमिटरवर Spo2 94 पेक्षा जास्त राहतोय व दम लागत नाहीये तोवर ईतर लक्षणांमुळे घाबरण्याचे कारण नाही. मन शांत ठेवावे व संयम पाळावा. 

HRCT (सिटीस्कॅन) कधी करावा =

तापाच्या, अंगदुखी  व लक्षणांच्या  पहिल्या चार पाच दिवसात लगेच सिटीस्कॅन करू नये तो नाॅर्मल येण्याची शक्यता अधिक असते. खोकला असणे, दम लागणे किंवा पल्स आॅक्सिमिटरवर Spo2 94 पेक्षा कमी होत आहे  ही सिटीस्कॅनची आवश्यकता असल्याचे सूचित करणारी लक्षणे आहेत. त्यावेळी सिटी स्कॅन करावा किंवा पाच दिवसानंतर सिटीस्कॅन करावा.. बऱ्याच वेळा गरज नसताना सिटीस्कॅन केला असतो तो टाळला पाहिजे. बरीच जणं पोस्टकोविड  20 दिवसांनंतर सिटीस्कॅन करतात त्याची काही गरज नाही. काही लक्षण  नसताना सगळ्यांनी सिटीस्कॅन केलं म्हणून मी करतो असं बरेच जण करतात तर हे टाळायला हवं....

ऍडमीट कधी व्हावे =

 रुग्णात लक्षणे जास्त जाणवत असतील, रूग्णास दम लागत असेल व पल्स आॅक्सिमिटरवर Spo2 ची लेव्हल बराच वेळ 94 पेक्षा कमी दाखवत असेल तर त्याचा अर्थ रूग्णाला आॅक्सिजन ची आवश्यकता आहे असा होतो. अशा रूग्णांना जवळच्या कोव्हिड हाॅस्पिटलमधे अॅडमिट करणे गरजेचे आहे. घरी वेळ घालवू नये. दुर्लक्ष बिलकुल करू नये.

90%पेशंट साध्या औषधांनीच बरे होतात.  त्याच बरोबर आयुर्वेद  औषधे घ्यावीत.. आयुर्वेदिक औषधांची कास धरावी..  काळजी करू नये. अति ताण घेऊ नये, मात्र पंधरा दिवस सावधगिरी बाळगायला हवी. सजग रहा सतर्क रहा आणि हा कोरणा विरुद्धचा लढा जिंकूया...

डॉ अभिजीत निकम.. 
M.D(आयुर्वेद )
9960495989..

Post a Comment

0 Comments