Daily Mahasatta

Daily Mahasatta

रेशनमध्ये अंगठ्याचे ठसे घेऊ नयेत, कडेगाव तालुक्यातील दुकानदारांची मागणी

कडेगावं : तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेने तहसिलदार डॉ शैलजा पाटील यांच्याकडे मागणीचे निवेदन दिले.

नेर्ली/ कडेगाव ( संदीप कुलकर्णी)
         कोरोना चा संसर्ग ग्राहकांना तसेच रेशन दुकानदार यांना होऊ नये यासाठी धान्य देताना ग्राहकांच्या अंगठ्याचे ठसे घेऊ नयेत, यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी रास्त भाव धान्य दुकान संघटनेने तहसीलदार डाॅ. शैलजा पाटील यांच्याकडे केली आहे.
           जिल्ह्यात तसेच कडेगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे, अशा परिस्थितीत शासनाने मागील पाच महिन्यापासून ग्राहकांचे बायोमेट्रिक बंद केले होते. पण मागील महिन्यापासून पुन्हा बायोमेट्रिक
प्रणालीद्वारे ग्राहकांच्या अंगठ्याचे ठसे घेऊन धान्य वाटप करावे असे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांसोबत दुकानदारांंना हि कोरोना चा संसर्ग होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदर आदेश रद्द करावा व दुकांनदारांचे ठसे घेऊनच धान्याचे वाटप करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी कडेगाव तालुका रास्त भाव धान्य दुकानदार यांच्यासह ग्राहकांनी केली आहे.याबाबतचे निवेदन कडेगावच्या तहसिलदार डॉ शैलजा पाटील यांना देण्यात आले.
         यावेळी कडेगाव तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष वसंत जाधव, जेष्ठ नेते पांडूरंग पोळ, सुर्यकांत देसाई, अशोक देशमुख, कमाल अत्तार, राजेंद्र यादव, प्रेमीला महाडिक, वैशाली गायकवाड यांच्यासह कडेगाव तालुक्यातील दुकानदार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments