Daily Mahasatta

Daily Mahasatta

खासदार संजय काका पाटील कोरोना पाॅझिटिव्ह

तासगाव, ( संजय माळी)
         सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय काका पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या दोनच दिवसांपूर्वी त्यांची टेस्ट घेतली होती त्याचा अहवाल आज सायंकाळी उशिरा प्राप्त झाला. त्यात कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
         त्यामुळे गेल्या कित्येक दिवसापासून जिल्ह्यातील कोरोना च्या परिस्थितीत उपाय योजना साठी प्रशासनाच्या सोबत सातत्याने आघाडीवर असणारे संजय काका पाटील कोरोना पाॅझीटीव्ह आल्याने कार्यकर्ते व सामान्य लोकांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.अल्पावधीत तासगाव येथे अत्याधुनिक कोव्हीड हॉस्पिटल उभारणीसाठी खासदार पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्या यश आले आहे. काकांच्या विशेष प्रयत्नातून लवकरच व्हेंटिलेटर बेड उभारण्यात येणार होते. कोरोना मुळे लोकांची होणारी फरफट थांबणार होती. पण त्यातच खासदार पाटील यांनाच कोरोनाची लागण झाल्याने आता चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
        यापूर्वीच आमदार सुमन पाटील, चिरंजीव रोहित पाटील, सुरेश पाटील यांना कोरोना झाला आहे आणि आता खासदार संजय पाटील यांना कोरोना झाल्याने तालुका पुरता हादरून गेला आहे.त्याचबरोबर तासगाव नगरपालिका चे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांची ही सोमवारी कोरोना टेस्ट पाॅझीटीव्ह आली आहे. 

Post a Comment

0 Comments