Daily Mahasatta

Daily Mahasatta

पेठ गावातील ' लाॅकडाऊन ' आणखी वाढविण्याचा निर्णय...

पेठ ( रियाज मुल्ला)
         पेठ (ता. वाळवा) येथील रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी आणखी तीन दिवस पेठ गावातील व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष शंकर पाटील यांनी दिली.
          गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याने त्याची संसर्ग साखळी तोडण्यासाठी 2 ते 7 सप्टेंबरपर्यंत गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून 100% लॉकडाऊन चा निर्णय घेण्यात आला होता. या महिन्याच्या सुरवातीला 17 रुग्णांची नोंद होती, मात्र आजअखेर कोरोना रुग्णांची संख्या 33 च्या पर्यंत गेली आहे. तसेच पेठेला संलग्न असणाऱ्या वाडीवस्तीत कोरोनाचा शिरकाव झाल्याने अजून तीन दिवस म्हणजे 10 सप्टेंबर पर्यंत लॉक डाऊन चा निर्णय घेण्यात आला.
          यावेळी जिल्हा परिषद सदस्य सम्राटबाबा महाडिक, बांधकाम समिती सभापती जगन्नाथ माळी, उपसरपंच दीपक कदम, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पवार, धनपाल माळी, विकास दाभोळे, अशोक माळी, आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments