Daily Mahasatta

Daily Mahasatta

नेर्ली येथील ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न सोडविणार : सभापती मंगलताई क्षीरसागर


नेर्ली ( प्रतिनिधी)
        नेर्ली येथील पठाण वस्तीवरील ट्रान्सफॉर्मर गेली दोन महिने नादुरुस्त झाल्यामुळे शिवारातील लोकांना नाहक ञासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत आपण महावितरण च्या अधिकार्यांना सुचना केली असून हा प्रश्न लवकरच सोडविण्यात येईल , असा विश्वास सभापती सौ मंगलताई क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.
       नेर्ली येथील पठाण वस्तीवरील ट्रान्सफॉर्मर गेली दोन महिने नादुरुस्त असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. याबाबत सभापती सौ मंगलताई क्षीरसागर यांनी लक्ष घालून संबंधित अधिकार्यांना येत्या चार पाच दिवसांत पठाण वस्तीवरील ट्रान्सफॉर्मर बसवून द्यावा अशा सुचना दिल्या. यावेळी बाजिराव मुळीक प्रदिप शिंदे, अक्षय शिंदे , चंद्रकांत शिंदे आणि ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments