Daily Mahasatta

Daily Mahasatta

पलूस मध्ये शिवसेनेच्या प्रशांत लेंगरे यांच्याकडून घरोघरी वाफेच्या मशीनचे वाटप

पलूस (प्रतिनिधी)
          शिवसेना उपनेते श्री नितिन बानुगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना ज़िल्हाप्रमुख आनंदराव पवार आणि संजय विभूते यांच्या सहकार्याने शिवसेना पलूस तालुक्याच्यावतीने शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रशांत लेंगरे यांनी वार्ड क्रमांक 1 मध्ये वाफेच्या मशिनचे वाटप सुरू केले आहे.
           पलूस शहरातील वाॅर्ड क्रमांक 1 मध्ये जवळजवळ दोनशे ते अडीचशे मशीनचे वाटप केले जाणार आहे. गोरगरिबांच्या घरामध्ये त्या कुटुंबाची काळजी म्हणून 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे प्रशांत लेंगरे यांनी उपक्रम राबविला आहे. त्यांच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
          यावेळी बोलताना त्यांनी जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत या मशीनचे वाटप करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली आणि लोकांनी घाबरून जाऊ नये. सर्दी, ताप, खोकला असे मौसमी आजार आहेत. कायमस्वरूपी हवामानात बदल होणारे आजार आहेत. यावर आपल्या स्थानिक डॉक्टरांच्या कडून उपचार घ्यावा आणि त्यातून जर जास्तच त्रास व्हायला लागला तर मात्र आपली सरकारी दवाखान्यांमध्ये जाऊन तपासणी करावी परंतु घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. हा आजार बरा होऊ शकतो. योग्य पद्धतीने त्याची काळजी घेतल्यास खबरदारी घेतल्यास तो आजार बरा नक्की होतो. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन या निमित्ताने मा.प्रशांतदादा यांनी केले. यावेळी प्रशांत लेंगरे, माजी तालुकाप्रमुख विशाल चव्हाण शहरप्रमुख, प्रविण गलांडे, कैलास सावंत, निलेश आडसुळे, दैवत दिवाण, प्रतिक देवकुळे, विनोद देवकुळे,जगदीश पवार, पै.श्रीकांत लेंगरे व शिवसैनिक उपस्थित होतो.

Post a Comment

0 Comments