Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाडमध्ये 'संजीवनी कोविड' सेंटरचे उद्घाटन

: आमदार सुधीर गाडगीळ यांचा पुढाकार 

कुपवाड (प्रमोद अथणीकर)
         आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या सहकार्याने कुपवाड येथे संजीवनी मल्टिकेअर हॉस्पिटलमध्ये 'कोव्हीड' सेंटर येथे ४० बेडच्या सुविधा केंद्राचे उद्घाटन आमदार सुधीरदादा गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
          हॉस्पिटलच्या सारी वार्डाचे उद्घाटन पी.एन.जी. फर्मचे संचालक समीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. कोव्हीड वार्डाचे उद्घाटन महापौर सौ. गीताताई सुतार व नगरसेवक शेखर इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी व आयुक्त यांनी सर्व हॉस्पिटलची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी कुपवाडसह सांगली व मिरज भागातील नागरिकांसाठी कोव्हीड सेंटरची अल्पदरात गरजू कोव्हीड पेशंटना उपचाराची सुविधा केल्याबाबत आ. सुधीरदादा गाडगीळ यांचे आभार मानले.
        'कोरोना' संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कुपवाड शहरातील रुग्णांची हेळसांड पाहता आमदार गाडगीळ यांच्या सहकार्यातून संजीवनी मल्टिकेअर हॉस्पिटलमध्ये 'कोविड' सेंटरची उभारणी करण्यात आली. सदर सेंटरवर सुमारे चाळीस बेडची सुविधा करण्यात आली आहे. ऑक्सिजनसह चार व्हेंटिलेटर, एक एच.एच.एन.ओ,पंधरा मॉनिटरची व्यवस्था याठिकाणी उपलब्ध आहे. सांगली-मिरजेसह कुपवाड भागातील रुग्णांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
          आमदार गाडगीळ म्हणाले, कुपवाड परिसरात असे 'कोविड' सेंटर उभारण्याची गरज होती. यासाठी पुरुषोत्तम नारायण गाडगीळ फर्म तसेच जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांच्या माध्यमातून ते शक्य झाले. कोव्हीड रुग्णांचे हाल लक्षात घेता संजीवनी कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह चाळीस बेडची सुविधा उपलब्ध आहे. सर्वसामान्य रुग्णांना या कोव्हीड सेंटरचा अल्पदरात निश्चितपणे फायदा होणार आहे.
         यावेळी उपमहापौर आनंदा देवमाने, नगरसेवक धीरज सूर्यवंशी, नगरसेवक गजानन मगदूम, नगरसेवक प्रकाश ढंग, नगरसेविका सोनालीताई सागरे, माजी नगरसेवक विठ्ठलतात्या खोत, विश्वजीत पाटील, दीपक माने, रमेश आरवाडे, शरद नलवडे, केदार खाडिलकर, श्रीकांत वाघमोडे, महेश सागरे, महेंद्र पाटील, सुभाष गडदे, राहुल माने, चेतन माडगुळकर, तसेच संजीवन हॉस्पिटलचे डॉ. राहुल सुर्वे, डॉ. जयंत भोसले, डॉ. संतोष पाटील, डॉ. विनय शिंदे, संचालक उमेश भोसले, महेश भोसले, संजय मोहिते तसेच या भागातील नागरिक तसेच हॉस्पिटलचे डॉक्टर व नर्सिंग स्टाफ उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments