जत मधील रुग्णांना चांगल्या सुविधा मिळतील : आम. विक्रमसिंह सावंत

 


जत ( सोमनिंग कोळी )
    येथील आयएमएच्या सर्व डॉक्टरांनी पुढाकार घेवून मंगळवारी कोव्हिड केअर सेंटर सुरू केले आहे. या कोव्हिड केअर सेंटरमध्ये ५० खाटांची सोय करण्यात आली आहे. आयएमएने उभं केलेलं हे कोव्हिडं केअर सेंटर कोरोनाबाधित रुग्णांना चांगल्या  सुविधा देईल, असा विश्वास आ. विक्रमसिह सावंत यांनी व्यक्त केला.

     जत तालुक्यात करोनाचा संसर्ग वाढत असल्याने रुग्णालयांवर प्रचंड ताण आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी खाटा शिल्लक नसल्याने रुग्णांची हेळसांड होते. वेळेत उपचार न झाल्याने रुग्णांचा मृत्यूदर वाढत आहे. हे टाळण्यासाठी सामाजिक संस्थांनी रुग्णालये सुरू करावित असे आवाहन आमदार विक्रमसिह सावंत केले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत जत येथील इंडियन मेडिकल असोसिएशनने कोव्हिडं सेंटर सुरू केले आहे.
        आयएमएचे जत तालुका अध्यक्ष डॉ. रोहन मोदी, उपाध्यक्ष डॉ. शरद पवार, डॉ.काळगी, डॉ.राजाराम गुरव, शालीवान पठनशेठ्ठी यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या जत येथील  सामाजिक न्यायविभाग मुलींची शासकीय निवाशी शाळा येथील  कोव्हिड केअर सेंटर चे उदघाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे, तहसीलदार सचिन पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बंडगर, मुख्याधिकारी मनोज देसाई , आयएमए जतचे अध्यक्ष डॉ.रोहन मोदी, उपाध्यक्ष डॉ.शरद पवार, डॉ.काळगी, डॉ.गुरव जत मंडळ अधिकारी संदीप मोरे तलाठी रविंद्र घाडगे आदी उपस्थित होते.
..............................
चौकट
     शासकीय दरापेक्षा २५
     टक्के स्वस्त दरात सेवा..
      डॉ.रोहन मोदी म्हणाले, कोरोनाचे संकट हे आपल्यापुढे वाढून ठेवल्याने हे सेंटर सुरू करण्यात येत आहे.रुग्णाची सेवा करण्यासाठी आम्हाला एक संधी मिळाली आहे.जत तालुक्यातील आयएमएच्या सर्व डॉक्टरांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्राधान्य दिले आहे.येथे शासनाने ठरवून दिलेल्या रक्कमे पेक्षाही 25 टक्के कमी दरात सेवा दिली जाणार असल्याचे सांगितले.


जत : येथील कोव्हिडं हॉस्पिटलचे उद्घाटन करताना  आ. विक्रमसिंह सावंत. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे, तहसीलदार सचिन पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बंडगर, मुख्याधिकारी मनोज देसाई , आयएमए जतचे अध्यक्ष डॉ.रोहन मोदी, उपाध्यक्ष डॉ.शरद पवार.


Post a comment

0 Comments