नेर्ले ता वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समिती च्या वतीने ऑक्सिजन व्यवस्था करण्यात आली आहे.
पेठ (रियाज मुल्ला)
नेर्ले तालुका वाळवा येथे लोकसहभागातून ऑक्सिजन पुरवठा करणारे कोरोना केअर सेंटर ऑक्सिजन विभाग सुरू करण्यात आला. या तात्पुरत्या
ऑक्सिजन मुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे. आपत्ती व्यवस्थापन
समितीसह विविध क्षेत्रातील ग्रामस्थांनी हे ऑक्सिजन सेंटर उभे करण्यासाठी आर्थिक
मदत केली आहे.
नेर्ले येथे आपत्ती व्यवस्थापन समिती च्या
बैठकीत वाळवा प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी कोरोना केअर सेंटर संदर्भात बैठक
घेतली होती. यावेळी त्यांनी सूचना
देऊन लोकवर्गणीतून हे सेंटर उभे राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आपत्ती व्यवस्थापन
समितीने निर्णय घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने हे ऑक्सिजन सेंटर उभे केले.ग्रामपंचायत व आपत्ती समितीच्या माध्यमातून गावातून निधी
संकलित करण्यात आला. रुग्णांना त्वरित
ऑक्सिजन उपलब्ध होईल अशी व्यवस्था प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली आहे.
ज्या रुग्णांची ऑक्सिजन लेवल ८० पेक्षा कमी आहे अशा रुग्णांना पुढील
दवाखान्यासाठी संदर्भित केले जात आहे. लोकवर्गणीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी
स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी हे पाच बेडचे ऑक्सीजन युक्त कोरोना केअर
सेंटर सुरू केले आहे. गावातील ज्या रुग्णाचे ऑक्सिजन कमी होईल अशा रुग्णांना येथे ऑक्सिजनमुळे जीव
वाचणार आहे.ही ऑक्सिजन व्यवस्था
तात्पुरत्या स्वरूपाची असून पेशंट स्टेबल होईपर्यंत त्याला
ऑक्सिजन पुरवठा केला जाईल. तोपर्यंत त्याच्या
नातेवाईकांनी स्वतःच्या जबाबदारी वर रुग्णाच्या पुढील उपचारासाठी प्रयत्न करावेत.असे आवाहन आपत्ती
व्यवस्थापन समितीने केले आहे.
लोकवर्गणीच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा
करणारे नेर्ले हे गाव वाळवा तालुक्यात अग्रेसर ठरले आहे. रुग्ण याचा लाभ घेत आहेत. रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी हे कोरोणा केअर सेंटर अविरत चालू ठेवण्यासाठी
दानशूर व्यक्तींनी अजूनही मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन
समितीने केले आहे.
यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर शिंदे, डॉ.सुशांत वायदंडे, तलाठी पंडित चव्हाण, ग्रामविकास अधिकारी
एम. डी. चव्हाण, सरपंच सौ छाया रोकडे, उपसरपंच विश्वास
पाटील, माजी सरपंच संभाजी पाटील, राजारामबापू बँकेचे संचालक
संजय पाटील, माजी तंटामुक्ती चे अध्यक्ष सतीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य महेश
पाटील, धनंजय पाटील व पत्रकार यांचे सहकार्य लाभत आहे.
…………………………………..
आता घाबरण्याचे कारण नाही..!
नेर्लेत आतापर्यंत ८० कोरोनाग्रस्त लोक
आढळले आहेत.अन्य आजाराने
मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.बेड मिळत नसल्याच्या काळजीने रुग्ण हवालदील झालेत.रात्री-अपरात्री रुग्णांना
तात्पुरते ऑक्सिजन देणारे हे कोरोना सेंटर जीवनदायी ठरणार आहे.
0 Comments