Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत विना मास्क फिरणाऱ्यांना कारवाईचा दणका

कुपवाड (प्रमोद अथणीकर) 
       सांगली शहरातील संजय नगर परिसरात विना मास्क व सोशल डिस्टन्स न बाळगता फिरणाऱ्यांवर संजय नगर पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारत २३ हजार ८०० रुपये इतका दंड वसुली केला आहे.
        अधिक माहिती अशी, संजय नगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक काकासो पाटील व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी विना मास्क फिरणारे व सोशल डिस्टन्स न ठेवणारे असे एकूण 119 जणांवर कारवाई करत 23 हजार 800 इतक्या रकमेचा दंड वसूल केला आहे. संजय नगर चे पोलीस निरीक्षक स्वतः चौकामध्ये थांबून विना मास्क फिरणारे व सोशल डिस्टन्स न ठेवता कायद्याचे उल्लंघन करणारे लक्ष ठेवून कारवाई करत आहेत. त्यामुळे मोकाट आणि बेजबाबदारपणे फिरणांरावर चांगलीच जरब बसली आहे.
          कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. नागरिकांनी देखील नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक काकासो पाटील यांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments