Daily Mahasatta

Daily Mahasatta

संपतराव देशमुख दुध संघाकडून २० ऑक्सीजन मशीनचे वाटप

कडेगाव : संपतराव देशमुख को. ऑप. मिल्क युनियन लि; कडेपुरच्या ऑक्सिजन कॉन्स्ट्रेट मशिनचे वाटप करताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख.

कडेगाव : ( सचिन मोहिते)
         कोरोना काळात ऑक्सिजन अभावी अनेकांना जीव गमवावा लागला आहे. शासकीय यंत्रणा कमी पडत आहे, म्हणून आता गप्प बसून चालणार नाही, म्हणूनच आम्ही संपतराव देशमुख को. ऑप. मिल्क युनियन लि; कडेपुरच्या वतीने २० ऑक्सिजन कॉन्स्ट्रेट मशीन घेण्याचा निर्णय घेतला. आता आणखी मशीन घेऊ पण प्रत्येक जीव महत्वाचा आहे, ऑक्सिजन अभावी कडेगाव तालुक्यात कोणाचा मृत्यू होणार नाही, असा विश्वास संग्राम देशमुख यांनी व्यक्त केला.
        कडेगाव पंचायत समिती येथे संपतराव देशमुख को. ऑप. मिल्क युनियन लि; कडेपुर. ता. कडेगाव यांच्या वतीने सांगली जिल्हा परिषद मा.अध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या हस्ते कडेगाव तालुक्यासाठी २० ऑक्सिजन मशिन प्रांताधिकारी गणेश मरकड साहेब व कडेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माधव ठाकूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
          यावेळी संग्राम देशमुख म्हणाले की कोरोना सारखे संकट पूर्ण जगावर आले आहे. हे संकट आपल्या जवळ केव्हा आले, हे समजले सुद्धा नाही. अशा परिस्थितीत अनेक जवळच्या माणसांना आपण गमावलं आहे. खरं तर आपण एक माणूस गमावत असलो तरी ती व्यक्ती त्या कुटुंबाचा आधार असते. त्या कुटुंबातील कर्ता पुरूष व स्त्री असते ती कर्ती व्यक्ती जाण्याने येणारी संकटे हि त्यांनाच माहिती आसतात अशा व्यक्ती ज्यावेळी त्या कुटुंबातुन निघून जातात, ती पोकळी कधीही भरून येणारी नसते.
         काही दिवसांपासून अनेकांना बेड उपलब्ध होत नाहीत, तर ऑक्सिजन अभावी अनेकांचे प्राण गेले आहेत. गेल्या तीन चार महिन्यात आरोग्य व्यवस्थेत सुधारणा होईल अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. वाढत्या रुग्ण संख्येपुढे आता आरोग्य व्यवस्था अत्यंत तोडकी पडत आहे. अशा कठीण काळात आता किमान ऑक्सिजन अभावी कोणाचा मृत्यू होऊ नये म्हणून आम्ही ऑक्सिजन कॉन्स्ट्रेट मशीन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. या मशीन कुटुंब वाचवण्याचे काम नक्कीच करेल. ही कृती मी माझं कर्तव्य म्हणून करीत आहे. शिवाय रुग्णांना बेड मिळवून देणे, औषधे उपलब्ध करून देणे, नॉन कोविड रुग्णांना उपचार उपलब्ध करून देणे, यासाठी देखील काम सुरू आहे. या करिता आम्ही काही नंबर प्रसारित केले आहेत, त्या नंबर वर २४ तास केव्हाही फोन करा. या संकटात हक्काचा माणूस म्हणून मला केव्हाही हाक मारा. मी आपणास सेवा देण्यात कुठेही कमी पडणार नाही.
          यावेळी कडेगाव तहसीलदार डॉ. शैलजा पाटील , कडेगाव पं. स. सभापती मंगलताई क्षीरसागर, उपसभापती आशिष घार्गे , डॉ. अभिषेक रेणूशे, डॉ. कालेकर, चेअरमन मा. तानाजी जाधव, कडेगाव पं. स. माजी सभापती मंदाताई करांडे, माजी उपसभापती रविंद्र कांबळे, पं. स. सदस्य रविंद्र ठोंबरे, कोतवडे सरपंच संभाजी यादव, सतीश जाधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments