Daily Mahasatta

Daily Mahasatta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली जिल्ह्यात सेवा सप्ताह साजरा करणार

: भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची माहिती

नेर्ली / कडेगाव (संदीप कुलकर्णी)
           सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी दिली आहे.
         श्री देशमुख म्हणाले, संपूर्ण देशभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा सप्ताहाच्या रूपात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करत आहे. सेवा सप्ताहात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातही कोव्हीडची 19 ची सर्व दक्षता घेत व शासकीय नियम व सूचना यांचे पालन करून अनेक ठिकाणी हा सप्ताह साजरा केला जाणार आहे.
या सेवा सप्ताहात प्रत्येक मंडलमध्ये वृक्ष लागवड अभियान, स्वच्छता अभियान, प्लास्टिक मुक्ती अभियान, मोफत कायदेविषयक सल्ला शिबिर तसेच रुग्णांना फळे वाटप आधी कार्यक्रम घेण्याचे ठरले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्ये व महात्मा गांधी जयंतीनिमित्त चे कार्यक्रम 14 ते 20 सप्टेंबर या कालावधीत विविध सेवा कार्यांचे आयोजन करून साजरे केले जातील.
         या अभियानाची जवाबदारी श्री मिलिंद कोरे यांच्याकडे देण्यात आली असून सर्व मंडळ अध्यक्ष या सेवा कार्याचे सहसंयोजक असतील. सर्व मंडल स्तरावर बैठका घेऊन कार्यक्रमाचे आयोजन करायचे आहे. श्री देशमुख पुढे म्हणाले की पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेत असतानाच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या संकल्पनेतील अंत्योदय सेवेचे काम सुरू केले आणि थोड्याच कालावधीत त्यांनी वंचित, मागासलेल्या शोषीत गरिबांना समर्पित अशा कित्येक योजना तळागाळातील जनतेपर्यंत थेट पोचवल्या. यावेळी चा कोरोना ची काळजी काळजी घेत पंतप्रधानांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी उत्साहात हा सेवा सप्ताह साजरा करावा, असे आवाहन श्री देशमुख यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments