Daily Mahasatta

Daily Mahasatta

पुणे पदवीधरसाठी वंचित बहुजन तर्फे प्रा. सोमनाथ साळुंखे


-अॅड.प्रकाश आंबेडकरांची घोषणा

सांगली,  (प्रतिनिधी) पुणे पदवीधर मतदार संघ 2020 च्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूर येथील नुकत्याच झालेल्या मेळाव्यात प्रा.  साळुंखे यांच्या उमेदवारी ची घोषणा केली. या बाबतचे अधिकृत पत्र पार्टीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.
    प्रा.सोमनाथ साळुंखे यांच्या उमेदवारी मुळे सांगली जिल्ह्यासाठी या निवडणुकीत प्रतिनिधित्व मिळाल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. प्रा. साळुंखे हे कवठेएकंद ता. तासगाव येथील रहिवासी असून कॉम्प्युटर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये मास्टर डिग्री प्राप्त आहेत. उच्च विद्याविभूषित असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून ज्ञान दानाचे कार्य करीत आहेत. विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांपासून सांगली जिल्ह्यात पदवीधर परिवर्तन विकास च्या  माध्यमातून अनेक नवीन संकल्पना, सामाजिक उपक्रम राबवून अनेक बदल घडवून आणले. पश्चिम महाराष्ट्रात पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी ते लढत आले आहेत. पदवीधरांच्या विविध मागण्यांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. समाजातील विविध घटकवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आंदोलने उभारून समाजबांधवांना न्याय मिळवून दिला आहे.
    स्वाफ्टवेअर इंजिनिअर असणाऱ्या प्रा.साळुंखे यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम राबवून उठावदार काम केले आहे. भारत सरकारचा नेहरू यूवा पुरस्कार प्राप्त असलेल्या प्रा.साळुंखे यांनी विविध संघटनांच्या माध्यमातून भरीव कामगिरी करून सामाजिक कामाचा ठसा उमटविला आहे. या जोरावरच पश्चिम महाराष्ट्रातील समस्त पदवीधर बांधवांनी पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत बहुजन वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी सांगली जिल्ह्यातील क्रांतिकारी वारसा असणाऱ्या चळवळीतील युवक कार्यकर्त्याला पाठबळ देण्याच्या दृष्टीने प्रा.सोमनाथ साळुंखे यांना पुणे पदवीधर मतदार  संघातून निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे.
    पदवीधरांच्या अनेक समस्या बेरोजगारीचा प्रश्न अशा अनेक प्रश्नासाठी प्रामुख्याने प्रा.साळुंखे काम उभे केले आहे या माध्यमातूनच पुणे पदवीधर मतदारसंघात सांगली जिल्ह्यासाठी प्रतिनिधित्व मिळाले आहे. समाजकारण आणि राजकारण यांची सांगड घालत अनेक सामाजिक प्रश्न तडीस नेण्यासाठी पदवीधरांच्या आपल्या हक्काचा आपला माणूस म्हणून प्रा.साळुंखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सर्वच ठिकाणातून या निर्णयाचे जोरदार स्वागत झाले बहुसंख्य कार्यकर्ते निवडणूक यंत्रणेच्या कामाला लागले आहेत. सांगली,कोल्हापूर,पुणे,सातारा व सोलापूर अशा जिल्ह्यातील पदवीधर बांधवांनी कार्यकर्त्यांनी बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात मशागत चालू केली आहे. 
................................................................

 सांगली  जिल्हा अग्रेसर राहील... 
     बहुजन वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातील बहुजन वंचित आघाडीचे पदाधिकारी पदवीधर निवडणुकीत उच्चांकी मतदान देण्यासाठी अग्रेसर राहतील असे बहुजन वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक गुरव यांनी सांगितले. पार्टीचे 5 जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे खूप दाट जाळे असून सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक गुरव यांनी दिली आहे.


 

Post a Comment

0 Comments