Daily Mahasatta

Daily Mahasatta

पेठ येथे कोरोना केअर सेंटरचा शुभारंभ

: दहा बेडचे प्रथमोपचार केंद्र सुरू 

पेठ ( रियाज मुल्ला)
        ' माझा गाव, माझी जबाबदारी' या योजनेअंतर्गत पालकमंत्री जयंत पाटील यांच्या सहकार्यातून पेठ येथे 10 बेडचे प्रथमोपचार केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील व शिराळा विधानसभा मतदार संघाचे आमदार मानसिंग भाऊ नाईक यांच्या हस्ते करण्यात आले .
           कोरोना या भयंकर महामारी च्या काळात सर्वसामान्य लोकांना बेड व ऑक्सिजनची कमतरता भासत आहे, ऑक्सिजन अभावी लोकांचे प्राण जात आहेत. याचे गांभीर्य ओळखून पेठेचे युवानेते अतुल पाटील यांनी पुढाकार घेऊन आज पेठेतील कन्या शाळेजवळ पेठ कोरोना केअर सेंटर सुरू केले आहे. यामध्ये तीन ऑक्सीजन मशीन एक सिलेंडर व 10 बेडची सोय करण्यात आलेली आहे.
          कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पेठ परिसरातील रुग्णांची संख्या बघता बघता 70 पर्यंत पोहचली. त्यातील काही रुग्ण ऑक्सिजन अभावी दगावले. रुग्णांचे वाढते प्रमाण आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधांचा अभाव पाहता पेठे चे युवा नेते अतुल पाटील यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांचेशी चर्चा करून सर्वसामान्य रुग्णांना सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून हे कोराना सेंटर उभे केले असून सर्वसामान्य रुग्णांना निश्‍चितपणे याचा फायदा होणार आहे.
          कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक अतुल पाटील यांनी केले.सूत्रसंचालन नामदेव भांबुरे यांनी तर आभार संदीप पाटील यांनी मानले. याप्रसंगी तहसीलदार रवींद्र हसबनीस, प्रांताधिकारी नागेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय पाटील, आत्मशक्ती पतसंस्थेचे चेअरमन हंबीरराव पाटील ,पेठ आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना कोडग, डॉ.वैशाली देवापुरे, फिरोज ढगे, माजी सरपंच विजय पाटील, हणमंत कदम, शरद पाटील, तुळशीदास पेठकर, संतोष बाबर, शिवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या कोरोना सेंटर साठी पेठ येथील डॉ. मुसाअल्ली जमादार, डॉ. सुभाष भांबुरे, डॉ. महेश पाटील, डॉ.टी. एस. पाटील, डॉ. मानसिंग पाटील, डॉ.संजय पाटील हे सर्वजण प्रयत्नशील राहणार आहेत.
यावेळी सोहम रवींद्र बेडके या चिमुकल्याने वाढदिवसाचा खर्च टाळून या कोरोना सेंटर साठी आटोमॅटिक सेनिटायझर मशीन भेट दिली.

Post a Comment

0 Comments