Daily Mahasatta

Daily Mahasatta

मंत्री विश्वजीत कदम पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील ९ आमदार आणि १ खासदार पाॅझीटीव्ह


कडेगाव (सचिन मोहिते)
           महाराष्ट्र राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री आणि पलूस कडेगाव मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजीत कदम यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत मंत्री  कदम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना माहिती दिली आहे.
          मंत्री विश्वजीत कदम यांनी म्हटले आहे,
माझा पलूस कडेगांव मतदारसंघ, सांगली जिल्हा, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचा पाठपुरावा, कोरोना संसर्ग रोखण्याच्या उपाययोजना, मंत्रालयातील बैठका, भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने पूरपरिस्थिती दौरे, भारती विद्यापीठ कामकाज अशा धावपळीच्या कारभारात योग्य ती वैद्यकीय खबरदारी घेत होतोच. परंतु अखेर मला कोरोना संसर्ग झालाच!
        थोडा ताप आणि अंगदुखी, अशी सौम्य लक्षणे दिसू लागल्याने काल चाचणी करून घेतली. आज त्याचा अहवाल आला आणि मी कोरोना पॉझिटिव्ह झालो. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी बाळगावी ही विनंती. माझ्या तब्येतीला कोणताही धोका नाही. वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली  घरीच विलगीकरणात मी उपचार घेत आहे. माझे कार्यालय नियमित सुरू असून मी देखील फोनच्या माध्यमातून उपलब्ध राहण्याचा प्रयत्न करेन.
संसर्गातून पूर्ण बरा होत लवकरच आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन, हा विश्वास व्यक्त करतो, अशा भावना मंत्री डाॅ विश्वजीत कदम यांनी व्यक्त केल्या आहेत.
         दरम्यान सांगली जिल्ह्यात आमदार मोहनराव कदम, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, आमदार अनिल बाबर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यानंतर डॉक्टर विश्वजीत कदम यांचा देखील कोरणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण ९ आमदार तसेच जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील पाॅझीटीव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर आली आहे.


 

Post a Comment

0 Comments