: मटका अड्डा चालकाविरोधात गुन्हा दाखल
कुपवाड (प्रमोद अथणीकर)
कुपवाड एमआयडीसी परिसरातील गोदरेज कंपनी समोरील मटका अड्डयांवर पोलिसांनी धाड टाकून सुमारे ४ हजार ७०५ रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
गेल्या काही दिवसांपासून कुपवाड पोलिसांनी अवैद्य धंद्यावर आळा बसवण्यासाठी कारवाईचे सत्र चालू ठेवले असून अनेक दारू अड्डे उद्वस्थ करून त्याच्या वर गुन्हे नोंद केले आहेत. तसेच आज मटका अड्डा उदवस्त करून संशयित आरोपी अजित बाबा लाल बगारे (वय वर्ष 41. रा. ईदगाह नगर ) मिरज याला मटका घेताना रंगेहात पकडले त्याच्याकडून पेन, मोबाईल रोख रक्कम मिळून एकूण 4705 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत.
0 Comments