Daily Mahasatta

Daily Mahasatta

कडेगाव तालुक्यात नवीन कोव्हीड सेंटर उभारण्याची गरज

नेर्ली/ कडेगाव ( संदीप कुलकर्णी)
         कडेगाव शहरासह तालुक्यात कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता येत्या काही काळात कडेगाव तालुक्यात शंभर बेडचे कोविंड सेंटर उभारण्याची आवश्यकता आहे, असे मत कडेगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव ठाकूर यांनी व्यक्त केले
          डॉ. ठाकूर म्हणाले, कडेगाव तालुक्यात सध्या कोव्हीड सेंटरची संख्या दोन आहे. यामध्ये कडेगाव कोव्हीड सेंटर मध्ये 40 बेड आहेत तर अॅडमिट रुग्णांची संख्या 37 आहे तर चिंचणी मधील ग्रामीण रुग्णालयात 8 बेड तर अॅडमिट रुग्णांची संख्या 8 इतकी आहे. तर चिंचणी मध्ये उभारण्यात आलेल्या कोव्हीड सेंटर मध्ये 50 बेड ची सुविधा आहे तर यामध्ये 37 रुग्ण उपचार घेत आहेत तर घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. तब्बल 461 लोक घरीच राहून कोरना वर उपचार घेत आहेत. घरी राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता येत्या काही काळात कडेगाव तालुक्यासाठी 100 बेडचे कोव्हीड सेंटर उभारण्याची गरज असल्याचे डॉक्टर ठाकूर यांनी मत व्यक्त केले. तसेच येणाऱ्या काही काळात रुग्णांची संख्या वाढू शकते. त्यामुळे लोकांनी अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडावे तसेच सोशल डिस्टंसिंग चे काटेकोरपणे पालन करावे, असे आव्हान त्यांनी केले.

Post a Comment

0 Comments