Daily Mahasatta

Daily Mahasatta

मुस्लिम बांधवांनी सुरू केलेले कोव्हीड सेंटर सर्वांचे आधार केंद्र बनेल : मंत्री जयवंतराव पाटील

इस्लामपूर : येथे मुस्लिम समाजाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरच्या उदघाटनप्रसंगी बोलताना ना.जयंत राव पाटील. समवेत पिरअली पुणेकर, मुनीर पटवेकर, दादासो पाटील, विजयबापू पाटील व मान्यवर.

इस्लामपूर ( सूर्यकांत शिंदे )
           मुस्लिम समाजाने सामाजिक बांधिलकीतून सुरू केलेले कोविड केअर सेंटर सर्व समाजांचे आधार केंद्र बनेल, असा विश्वास राज्याचे जल संपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला. समाज व शासनाच्या माध्यमातून उभा रहाणाऱ्या सोई- सुविधामधून निश्चितपणे मृत्यूदर कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
            इस्लामपूर येथील ख्रिश्चन बंगला परिसरातील चाँदतारा मदरसामध्ये मुस्लिम समाजाने सुरू केलेल्या ७० बेडच्या अद्यावत कोविड केअर सेंटरचे ना.पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक पिरअली पुणेकर, माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर,उप नगराध्यक्ष दादासो पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
          ना.पाटील म्हणाले,कोविडच्या वाढत्या संख्येमुळे सरकारने केलेल्या व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत. या परिस्थितीत समाजाने पुढे येवून काही सुविधा उभा करणे कौतुकास्पद आहे. सध्या हॉस्पिटलची बिले ऐकुन रुग्ण हॉस्पिटलमध्ये जात नाही, हा आपला पराभव आहे. कोरोना कोणालाही होवू शकतो, याचे कायम भान ठेवत सुरक्षित अंतर ठेवा, मास्क वापरा व हात धुवा. माझे कुटुंब,माझी जबाबदारी उपक्रमात सहभागी होवून आपले शहर, आपले गांव 'शून्य रुग्ण' संख्येवर आणा. यावेळी त्यांनी समाजाच्या साथीने कमी वेळेत, लाखो रुपयांचे हॉस्पिटल उभा केल्याबद्दल कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
           मुनीर पटवेकर म्हणाले, ना.जयंत राव पाटील यांनी रु.५ लाख, प्रतिक दादा पाटील यांनी १०० बेड, दिले आहेत. समाजाने रु.२५ लाख दिले आहेत. आम्ही सर्व समाजातील रुग्णावर उपचार करू. कोरोनाचे संकट दूर होईपर्यंत सेंटर चालू राहील. अल्ताफ मोमीन (सर) म्हणाले, डॉ.शाहिद कादरी, डॉ.फरिदूद्दीन आत्तार, डॉ.मोहसीन मुजावर, डॉ.सुहेल खान (औरंगाबाद) यांच्यासह पुण्या तील ४ डॉक्टर सेवा देणार आहेत.
अजहर जमादार म्हणाले, समाजा तील दानशूर व्यक्तींच्याबरोबर सामान्य कुटुंबेही या कार्यात सहभागी झाली आहेत. या कोविड सेंटरचे प्रणेते पिरअली पुणेकर, हाजी मुबारक ईबुशे, डॉ.फरिदूद्दीन आत्तार, डॉ.मोहसीन मुजावर यांचा ना.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
            याप्रसंगी प्रांताधिकारी नागेश पाटील,तहसीलदार रवींद्र सबनीस, डॉ.नरसिंह देशमुख,अरविंद माळी, अँड.चिमणभाऊ डांगे,विजयबापू पाटील,संजय पाटील, खंडेराव जाधव,हाफिज जावेद,मौलाना नरुले एन,रफिक पठाण,शकील जमादार, आयुब हवलदार,बशीर मुल्ला, अँड.मिनाज मिर्झा,जावेद ईबुशे,मासुम गणीभई,हिदायतुल्ला जमादार,जलाल मुल्ला,आबीद मोमीन,अश्पाक पुणेकर,नियाज बीजपुरे,राजू जमादार, अबुबकर मकानदार,इस्माईल पुणेकर, इम्रान डंगरे,अजहर मोमीन, सैफ अली,रमिझ दिवाण,एजाज मणेर, यांच्यासह मुस्लिम समाजातील कार्यकर्ते,व समाजबांधव उपस्थित होते. मुनीर ईबुशे यांनी आभार मानले.
•••••••••••••••••••
हॉस्पिटल गुरुवारी सेवेत!
        ७० बेडच्या हॉस्पिटलमध्ये ५ आयसीयु बेड आहेत. एक्सरेसह सर्व बेडना ऑक्सिजन सुविधा आहे. मलेशियावरून २ ड्युरा सिलेंडर मागविली आहेत. गुरुवारपासून हॉस्पिटल सेवेत रहाणार असल्याचे पिरअली पुणेकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments