Daily Mahasatta

Daily Mahasatta

विना मास्क दुचाकीवरून फिरणाऱ्यांवर कडेगाव पोलिसांची दंडात्मक कार्यवाही


नेर्ली/ कडेगाव ( संदीप कुलकर्णी)
        सांगली जिल्ह्यात तसेच कडेगाव तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत असताना काही नागरिक मात्र दुचाकी वरुन विना मास्क फिरत असल्याचे आढळून आले आहेत. अशा बेजबाबदार लोकांवर कडेगाव पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
         ग्रामीण भागातील कोरोनाचा फैलाव वाढतानाच दिसत आहे. कडेगाव शहरातील व्यापाऱ्यांनी कडकडीत जनता कर्फ्यू पाळला असला तरी काही नागरिक दुचाकीवरून डबल सीट किंवा ट्रिपल सीट विना मास्क कडेगाव शहरांमध्ये फिरत असलेले दिसत होते. त्याच अनुषंगाने कडेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली काल धडक दंडात्मक कार्यवाही सुरू केली. यावेळी पेट्रोलिंग करून विना मास्क फिरणारांवर दंडात्मक कारवाई सुरू केली. या कार्यवाहीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले गेले.
         कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे, तसेच कामाशिवाय बाहेर फिरू नये असे आव्हान काल पोलीस कर्मचारी नागरिकांना करत असलेले दिसून आले.

Post a Comment

0 Comments