Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपूर जवळील पेठ परिसरात बिबट्याचा वावर, नागरिकात भितीचे सावट


पेठ ( रियाज मुल्ला)

          इस्लामपूर शहराजवळील पेठ (ता. वाळवा) परिसरातील वारके पाणंद ते ज्यूस फॅक्टरीच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे आढळल्याने नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
     वारके पाणंद ते ज्यूस फॅक्टरी परिसरात हजारो एकर उसाचे क्षेत्र आहे. तसेच या भागात लोकांची वस्तीही आहे. वस्तीवरील कुत्रे, शेळ्या-मेंढ्या यांच्या आशेने या भागात बिबट्यांचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. या परिसरात  बिबट्याचा वावर वाढल्याने  ग्रामपंचायत सदस्य नामदेव कदम यांच्यासह या परिसरातील शेतकऱ्यांनी वनविभागाकडे धाव घेतली. वन विभाग अधिकारी आर. बी. पाटोळे यांनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत या परिसरात बिबट्या व तरस या प्राण्यांचा ठसे दिसून आल्याने त्यांचा वावर असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत जगन्नाथ माळी, रोहित पाटील, महेश कदम ,माणिक पाटील, विश्वास जाधव आदी प्रत्यक्ष पाहणी वेळी उपस्थित होते.
       यावेळी वनाधिकारी पाटोळे यांनी रात्रीच्या वेळी शेतात जायचे असेल तर टॉर्च किंवा शेकोटी पेटवावी असे सांगून बिबट्या दिसला तर त्याच्यावर स्वतःहून हल्ला करू नका असे आवाहन केले
................................
      चौकट
बिबट्याचा बंदोबस्त करावा..
        वारके पाणंद ते ज्यूस फॅक्टरी या परिसरातील ८० टक्के भागात जनावरांचे गोठे आहेत. या परिसरात आढळलेल्या बिबट्याचा वावर माझ्यासह अनेकांनी प्रत्यक्ष पाहिला आहे. याची दखल घेत जीवित हानी होण्याअगोदर वन विभागाने योग्य तो बंदोबस्त करावा.     
      नामदेव कदम,
       ग्रामपंचायत सदस्य. 

Post a Comment

0 Comments