Daily Mahasatta

Daily Mahasatta

प्रभाकर सनमडीकर यांचे अल्पशा आजाराने निधन


जत (नितीन टोणे)
      जनसुराज्य पक्षाचे जत तालुक्यातील नेते प्रभाकर लाह्याप्पा सनमडीकर (वय 59) यांचे सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात गुरुवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.
       जनसुराज्य पक्षाचे नेते तथा शाहुवाडीचे आमदार डॉ. विनय कोरे यांचे स्वीय सहाय्यक सनमडीकर हे आंबेडकरी चळवळीतील नेते होते. शिखर बँकेच्या नोकरीतून सेवानिवृत्त झालेनंतर ते आ. कोरे यांचे पीए म्हणून कार्यरत झाले होते. 2009 साली त्यांनी जत राखीव मतदारसंघात जनसुराज्य पक्षातून विधानसभा निवडणूक लढवली होती. गेल्या दहा दिवसा पासून ते आजारी होते. सोलापूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणजोत मावळली. 
      त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले होते. कार्यतत्पर , हुशार, संघटन कौशल्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती जतचे संस्थापक, व जत तालुका अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जतचे ते तालुकाध्यक्ष होते. राजकारणी, समाजकारणी सर्वांना बरोबर घेऊन जाणारे बौद्ध समाजाचे व बहुजन परिवर्तन चळवळीचे नेतृत्व हरपले अशा प्रतिक्रिया लोकांच्यातून येत आहेत.

Post a Comment

0 Comments