Daily Mahasatta

Daily Mahasatta

पंचायत समितीच्या उपसभापतींचे कोरोनामुळे निधन, शिराळा तालुक्यात शोककळा

चांदोली(नथुराम कुंभार)
        शिराळा तालुका पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती पांडुरंग यशवंत पाटील यांचे मंगळवारी सकाळी कोरोनाने निधन झाले.त्यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात गेल्या सात दिवसांपासुन उपचार सुरू  होते.मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने करुंगली गावासह तालुक्यात शोककळा पसरली आहे.
    पांडुरंग पाटील यांना परीसरात पी.वाय.मामा या नावाने ओळखले जात.सदैव हसतमुख, शांत स्वभावी असणारे मामा यांनी परीसरातील कार्यकर्त्याच्या मनामध्ये घर केले होते.पांडुरंग पाटील यांची जानेवारी 2020 मध्ये शिराळा तालुका पंचायत समीतीचे उपसभापती म्हणुन निवड झाली होती. तसेच निनाईदेवी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद ही त्यांनी भुषविले होते. त्याशिवाय निनाईदेवी सेवा सोसायटीचे चेअरमन पद ही त्यांनी सांभाळले होते. परंतु त्यांच्या अचानक जाण्यामुळे करुंगली गावावर शोककळा पसरली आहे.
 

Post a Comment

0 Comments