जतमध्ये 'माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ मोहीमेला सुरुवात ; आ. विक्रमसिह सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

जत ( प्रतिनिधी)
         राज्य सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान राज्यभर राबविण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत जत प्रशासनाने हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.आज या अभियानाचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जतचे गट विकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर , तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बंडगर, माजी सभापती बाबासाहेब कोडग आदी उपस्थित होते.
        यावेळी बोलताना आ. विक्रमसिह सावंत म्हणाले की, तालुक्यामध्ये कोरोना नियंत्रणासाठी आज पासून 'माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. याद्वारे प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचून आरोग्य शिक्षण व संशयित कोरोना रुग्णांचा शोध घेऊन त्यांना उपचारासाठी संदर्भ सेवा पुरविण्याचे कार्य केले जाणार आहे.त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला साथ देण्याचे आवाहन आमदार विक्रमसिह सावंत यांनी केले.
यावेळी गट विकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर म्हणाले, जत तालुक्यात कोरोनाचा प्रकोप चांगलाच वाढत आहे.शहराबरोबरच आता ग्रामीण भागातही परिस्थिती चिंताजनक होत आहे. ग्रामीणमधील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.या मोहिमेतून शहर, गाव, वस्त्या, तांडे येथील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.ज्येष्ठ व्यक्ती आजारी असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकाला व्यक्तिश: भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे.
        प्रशासनाला सूचनामोहीम कालावधीमध्ये गृहभेटी देण्यासाठी आरोग्य पथके तयार करण्यात आले आहेत.भेटीदरम्यान घरातील सर्व सदस्यांचा ताप मोजतील.ताप, खोकला, दम लागणे, अशी कोव्हीडशसदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना जवळच्या फीव्हर क्लिनिकमध्ये पाठवण्याचा सल्ला देतील.

Post a comment

0 Comments