Daily Mahasatta

Daily Mahasatta

बस्तवडेत 78 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर यशस्वी मात

तासगाव (प्रतिनिधी)
       बस्तवडे ता. तासगाव येथील बाळकाबाई राजाराम पाटील (वय 78 ) या वयस्कर महिलेने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यांच्या या कोरोना विरोधातील लढाईची गावात चर्चा सुरू असून तो एक कौतुकाचा विषय बनला आहे.
          बाळकाबाई पाटील यांना रक्त शर्करा , रक्तदाब आणि शारीरिक कमजोरी असतानाही त्यांनी साऱ्या जगावर दहशत माजवलेल्या कोरोनासारख्या रोगावर योग्य वैद्यकीय उपचार करून वयोवृद्ध असताना मात केली. त्या सुखरूप घरी पोहचलेल्या आहेत. सर्वप्रथम त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना तासगाव येथील कोव्हिड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल केले होते. बाळकाबाई पाटील यांनी न घाबरता उपचाराला सकारात्मक प्रतिसाद देऊन कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. व त्या सुखरूप घरी परतल्याने त्यांच्या कुटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला आणि बस्तवडे गावातील नागरिकांसमोर एक आदर्श बाळकाबाई राजाराम पाटील यांनी निर्माण केला.

Post a Comment

0 Comments