Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात महिनाभरात 5 आमदार कोरोना पाॅझिटीव्ह: जतचे आमदार विक्रम सावंत कोरोना पाॅझीटीव्ह

सांगली  ( राजेंद्र काळे  )
         जत विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांचा कोरोना चाचणी अहवाल आज पॉझिटिव आला आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरात सांगली  जिल्ह्यातील पाच आमदार कोरोनाबाधित झाल्याचे विदारक चित्र आहे.
        आमदार विक्रम सावंत यांनी काही दिवसांपूर्वी आपली कोरोना चाचणी केली होती. आज पालकमंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीला आमदार विक्रम सावंत उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांना मिळाली त्यानंतर त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे
        सांगली जिल्ह्यात आतापर्यंत आमदार सुरेश खाडे, आमदार मोहनराव कदम, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सदाभाऊ खोत असे चार विद्यमान आमदारांचे कोरोना चाचणी अहवाल  पॉझिटिव आले होते. आता विक्रम सावंत यांच्या कोरोना चाचणी अहवाल  पॉझिटिव आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या आमदारांची संख्या आता पाच वर पोहोचली आहे.आतापर्यंत  जिल्ह्यातील पाच विद्यमान आमदारांना कोरोनाची लागण झाल्याने राजकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.


 

Post a Comment

0 Comments