Daily Mahasatta

Daily Mahasatta

' माझे कुटुंब, माझी जबाबदारी ' योजना कडेगाव तालुक्यात 15 सप्टेंबर पासून राबविण्यात येणार

: प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. माधव ठाकुर

नेर्ली/ कडेगाव (संदीप कुलकर्णी)
         कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेचा पहिला टप्पा कडेगांव तालुक्यात दिनांक १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ माधव ठाकुर यांनी दिली आहे
         डाॅ. ठाकुर म्हणाले, सदर मोहिमअंतर्गत तालुक्यातील एकूण २६ हजार ४८६ घरातील १ लाख २८ हजार ७८ लोकसंख्येचे ७५ आरोग्य पथकामार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सदर सर्वेक्षण पथकामध्ये एकूण तीन आरोग्य कर्मचारी (आशा आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, शिक्षक अथवा स्वयंसेवक) यांचा समावेश असून सदर पथक प्रत्येक घरामध्ये भेटी देऊन घरातील सर्व व्यक्तीचे आरोग्य तपासणी जसे की तापमान व शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासणार आहे. त्यासोबतच हे पथक घरातील व्यक्तींना कोरोना बद्दल सर्व माहिती सोशल डिस्टंसिंग, मास्क व हात स्वच्छता, कोरोना होऊ नये याकरिता घ्यायची काळजी तसेच तपासणी व औषधोपचार कुठे उपलब्ध आहे याची माहिती देणार आहे.या सर्वेमध्ये ज्या व्यक्तींना कोरोना सदृष्य लक्षणे आहेत अशा व्यक्तींचे स्वॅब तपासणी उपकेंद्र/प्रा. आ.केंद्र स्तरावर करून घेण्यात येईल.सर्वे मधील व्यक्तींची माहिती शासनाद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या ॲप मध्ये नोंदविण्यात येणार आहे.
          या मोहिमेचा उद्देश आरोग्य तपासणी बरोबरच कोरोना या आजाराबद्दल व्यापक प्रमाणात जनजागृती करणे हा आहे त्याकरिता सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी यांनी काही स्वयंसेवक आरोग्य विभागाला उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती कडेगाव यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments