कडेगाव तालुक्यात उच्चांक, आज 100 कोरोना पॉझिटिव्ह

नेर्ली/ कडेगाव ( संदीप कुलकर्णी)
        जनता कर्फ्यू असूनही आज कडेगाव शहरात रोजच्या तुलनेने सर्वात जास्त रुग्ण सापडले. कडेगाव तालुक्यात आज कोरोना रुग्णांचा आलेख चढता दिसून आला. आज कडेगाव तालुक्यात एकूण 100 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
        यामध्ये चिंचणी -1, अंबक -4, कडेगाव शहरात-40, खंबाळे-2, हिंगणगाव बुद्रुक - 2, कडेपुर-3, रामापुर-3, पाडळी-1, पलूस-1, रेनुशेवाडी-1, शाळगाव-1, शिवणी-32, सोहोली-1, शेळकबाव-1, नेर्ली -1, वडियेरायबाग - 1, विहापुर -2, वांगी-1, वांगरेठरे '-२ असे एकूण 100 रुग्णांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले. कडेगाव तालुक्यात एकूण रुग्णांची संख्या 1493 तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 883 तसेच उपचारा खालील रुग्णांची संख्या 581 तर मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 29 वर पोहोचली आहे. तर आजचे कोरोना मुक्त रुग्ण 53 आहेत. एकंदरीत पाहता आज कडेगाव तालुक्याचा मागील काही दिवसांपासून कोरोना चा आलेख चढतानाच दिसून येत आहे. त्यामुळे जनतेने प्रशासनाला सहकार्य करून अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडावे तसेच सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे असे आव्हान डॉक्टर माधव ठाकूर यांनी केले आहे. 

Post a comment

0 Comments