ढवळेश्वरात सुयोग युवा शक्तीच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

विटा, प्रतिनिधी
          ढवळेश्वर ता.खानापूर येथील न्यू इंग्लिश स्कूल, ढवळेश्वर मधील एस एस सी २०२० परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समाजसेवक मा.भगवान (भाऊ) मंडले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी सूर्यकांत (बापू) काकडे प्रमुख उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे आयोजन सुयोग युवा शक्ती ढवळेश्वर यांच्यावतीने करण्यात आले.
           ढवळेश्वर येथील न्यू इंग्लिश स्कूलचा निकाल प्रथमच 100 टक्के लागला त्याबद्दल सर्व शिक्षक व कर्मचार्यांचा दखील सत्कार सुयोग युवा शक्तीच्या वतीने करण्यात आला .सोशल डिस्टन्स चे पालन करत मा.विकास दादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला .
या वेळी मुख्याध्यपक जाधव सर ,सर्व शिक्षक वर्ग, पंढरीनाथ किर्दत, तानाजी शिंदे, संदीप किर्दत विकास देशमुख अभि गायगवळे, किरण किर्दत, अमोल किर्दत, गणेश शिंदे, विशाल किर्दत, अक्षय मदने, नितीन देशमुख उपस्थित होते.

Post a comment

0 Comments