Daily Mahasatta

Daily Mahasatta

गोसावी समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी बाळगिरी गोसावी यांची निवड


चिंचणी (कुलदीप औताडे )
         शिववंशिय दशनाम गोसावी समाज संस्थेच्या माध्यमातून दशनाम समाजाला संघटित करुन
त्यांचे प्रश्न सातत्याने सोडवुन समाजाला नवी दिशा द्यायचे काम चालू आहे.त्यासाठी आज सांगली जिल्ह्यातून विविध पदांच्या निवडी करण्यात आल्या. यामध्ये सांगली जिल्हा अध्यक्षपदी बाळगिरी प्रेमगिरी गोसावी (चिंचणी),तसेच उपाध्यक्षपदी प्रदिप सुभाष गोसावी यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर सौ शोभा मारुती पुरी - महिला अध्यक्ष, सौ विभावरी नितीन गोसावी - महिला उपअध्यक्ष , अमोल बाजीराव गोसावी - युवा अध्यक्ष, विश्वजीत सुरेश गोसावी - युवा उप अध्यक्ष इत्यादी निवडी आज करण्यात आल्या.निवड झालेल्या सर्वांचे समाजाकडून स्वागत होत अाहे.

Post a Comment

0 Comments