जितेश लढवय्या, लवकरच कोरोनावर मात करेल : मंत्री डाॅ.विश्वजीत कदम


: मंत्री विश्वजीत कदम यांच्या कुटुंबातील तिघांना कोरोना

कडेगाव (सचिन मोहिते)
          ' माझा पुतण्या डॉ. जितेश कदम याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे माझे बंधू एच. एम. कदम आणि वहिनी यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यांच्यावर योग्य वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
           कोरोना संसर्गाचा मुकाबला करीत डॉ. जितेश हे पलूस-कडेगावसह सांगली-मिरज भागांमध्ये अहोरात्र सेवाकार्य करीत होते. क्वारेन्टाईन भागांमधील नागरिकांच्या जेवणाच्या व्यवस्थेपासून सॅनिटायझर, अर्सेनिक अल्बम गोळ्यावाटप अशा अनेक आघाड्यांवर ते सर्वसामान्य जनतेला मदत करीत होते. त्यांची तब्येत ठीक असून मी स्वतः उपचारांवर जातीने लक्ष देत आहे. डॉ. जितेश हे लढवय्ये असून कोरोना संसर्गावर मात करून ते पुन्हा जनसेवेसाठी कार्यरत होतील, असा विश्वास कृषी व सहकार राज्यमंत्री डाॅ विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे. 

Post a comment

0 Comments