Daily Mahasatta

Daily Mahasatta

अभिनेता संजय दत्तला फुप्फुसाचा कॅन्सर: कोरोनाची चाचणी निगेटीव्ह मात्र कॅन्सर झाल्याचे उघडकीस
         सांगली (राजेंद्र काळे)
        हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त याला फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा कॅन्सर तिसर्या टप्प्यात आहे. अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन  सुमन आणि फिल्म जर्नालिस्ट कोमल नाथ यांनी ट्विटरवरून संजय दत्तच्या आजाराबाबत  माहिती दिली आहे.
         अभिनेता संजय दत्त याला ८ ऑगस्ट रोजी श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी देखील घेण्यात आली. मात्र ही चाचणी निगेटीव्ह असल्याचे सांगण्यात आले. परंतु अन्य तपासणीमध्ये त्याच्या फुप्फुसाला  कॅन्सर असल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच संजय दत्त उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार आहे
           संजय दत्त हा प्रसिद्ध अभिनेते स्वर्गीय सुनील दत्त आणि स्वर्गीय नर्गीस यांचा पुत्र असून त्याने  काही वर्षांपूर्वी मान्यता हिच्या सोबत विवाह केला होता. त्यांना दोन  मुले आहेत. आपण कामातून काही दिवस ब्रेक घेणार असून कुटुंबीय आणि मित्रपरिवार माझ्या सोबत आहेत. त्यामुळे उलट सुलट चर्चा वर विश्वास ठेवू नका. तुमचे प्रेम आणी शुभेच्छा राहू द्या, असे ट्विट संजय दत्त याने केले आहे.

 

Post a Comment

0 Comments