वाघवाडीत वृक्षारोपणातून 'अस्थीविसर्जन 'माय फाउंडेशन शिक्षण संस्थेचे संस्थापक उदय पाटील यांनी  वृक्षारोपणातून 'अस्थीविसर्जन हा उपक्रम सुरू केला आहे.
 '

: पारंपारिक पद्धतीला फाटा देत पर्यावरण पुरक उपक्रम

पेठ ( रियाज मुल्ला)
       वाघवाडी गावच्या जडणघडणीत वाटा असलेले वाघवाडी ग्रामपंचायतीचे सेवक सुरेश पांडूरंग खामकर यांच्या अस्थी नदीपात्रात विसर्जित न करता त्यांच्या स्मृति जपण्यासाठी त्यांच्या शेतामध्ये वृक्षारोपण करून त्यामध्ये अस्थी विसर्जित करण्यात आल्या.पर्यावरणाचे रक्षण करत पारंपरिक पद्धतीला फाटा देण्यात आला.
       संपूर्ण आयुष्यात निस्वार्थी व अजात शत्रू असणारे सुरेश खामकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे भाचे माय फाउंडेशन शिक्षण संस्थेचे संस्थापक उदय पाटील यांनी पुढाकार घेत त्यांचे स्मरण सतत राहावे तसेच नदीपात्रात अस्थि विसर्जन करून प्रदूषण टाळावे यासाठी खामकर यांच्या शेतातच वृक्षारोपण करून त्या ठिकाणी त्यांच्या अस्थी विसर्जित केल्या आणि प्रगत विचारसरणीने प्रदूषण मुक्ती चा संदेश दिला.

Post a comment

0 Comments