Daily Mahasatta

Daily Mahasatta

टाळ - मृदंगाने ७० वर्षांचा प्रश्न सुटला, पण गावकी-भावकीचा तिढा कायम...


विटा : करंजे येथील ग्रामस्थांनी रस्त्यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.

विटा, प्रतिनिधी
          करंजे ता. खानापूर येथील ग्रामस्थांनी ११ ऑगस्ट रोजी करंजे ते विटा असा टाळकरी लाँगमार्च काढत ७० वर्षापासून रखडलेला करंजे ते यादवमळा या रस्त्याचा प्रश्‍न शासनदरबारी निकालात काढला. मात्र गावातील राजकारण पुन्हा एकदा आडवं आले आहे. शासनाच्या आदेशानंतर देखील काही मंडळींनी या रस्त्याला विरोध केल्यामुळे करंजे ता. खानापूर येथील ग्रामस्थांनी आज ता.१७ पासून विटा तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे
           प्रहार जनशक्ती पक्ष, अखिल भारतीय किसान सभा आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने विटा तहसिल कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. अकरा ऑगस्ट रोजी करंजे ते विटा टाळकरी लॉंगमार्च काढण्यात आला होता. सदरचा लॉंगमार्च रेवणगावपर्यंत आल्यानंतर विट्याचे तहसिलदार ऋषिकेत शेळके यांनी करंजे- यादवमळा हा मंजूर रस्ता तातडीने करण्याचे आदेेश दिले होते. मात्र पंचायत समितीचे अधिकारी चालढकल करताना दिसत आहेत.
         याबाबत दत्तकुमार खंडागळे म्हणाले, तहसिलदारांच्या व न्यायालयाचा आदेश डावलून रस्यात गावातील काही लोकांनी झाडे लावत वहीवाटीचा रस्ता अरूंद करण्याचे काम सुरु केले आहे. कायदा हातात घेवून लोकांची गळचेपी केली जात आहे. या गळचेपीला पंचायत समितीचे अधिकारी हातभार लावत आहेत. प्रशासनाच्या वेळकाढू धोरणाचा निषेध आणि हक्काच्या रस्ता मागणीसाठी आज सकाळपासून विटा तहसिल कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात आला आहे.
           रस्ता दिल्याशिवाय उठणार नाही, असा निर्धार करत सर्वांनी ठाण मांडले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्कप्रमुख दत्तकुमार खंडागळे, भाई भानुदास सुर्यवंशी, किसान सभेचे गोपिनाथ सुर्यंवशी, अँड विजय सुर्यंवशी, कॉम्रेड दिगंबर कांबळे, कॉम्रेड चंद्रकांत गोडबोले, शेकापचे विनोद लगारे, कॉम्रेड संतोष यादव, शिवाजी यादव, तुकाराम यादव, जयवंत यादव, भरत यादव, बापुराव यादव, नवनाथ यादव,रावसाहेब यादव,स्वप्निल पांडकर, सुमन यादव, शकुंतला यादव, लक्ष्मी यादव,वनिता यादव, रेखा यादव, सुनिता यादव आदी ग्रामस्थ बेमुदत ठिय्या आंदोलनात सामिल झाले आहेत.

Post a Comment

0 Comments