Daily Mahasatta

Daily Mahasatta

नगराध्यक्षांसह ११ जण पाॅझीटीव्ह, सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ


मांगले (राजेंद्र दिवाण)
        शिराळा नगरपंचायत मध्ये कोरोना शिरकाव झाला आहे. आज नगराध्यक्षा, अधिकारी व कर्मचारी मिळून ९ व इतर २ अशा एकूण ११ जणांना करोनाची लागण झाली असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शिराळा व्यापारी महासंघ यांनी शिराळा शहर सोमवार व मंगळवार असे दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
        नगरपंचायत मधील एका २७ वर्षीय अधिकारी यास १२ आॅगस्ट ला कोरोना लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर नगरपंचायत मधील सहवासातील असणाऱ्या सर्वच लोकांचे स्वँब घेण्यात आले होते. त्यापैकी नगरपंचायत मधील नऊ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
         शिराळा शहरात गेल्या दोन दिवसात १७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. शहरात आजअखेर कोरोनाचे ३० रुग्ण आढळून आले आहेत. याचबरोबर नगरपंचायत च्या नगराध्यक्षा व नगरपंचायत मधील सात अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना ची लागण झाली आहे. हा वाढता कोरोना चा प्रसार तसेच समूह संसर्ग टाळणेसाठी शिराळा शहर सोमवार व मंगळवार असे दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय शिराळा व्यापारी महासंघ याचे वतीने घेण्यात आला असून यावेळी अमोल पारेख , दस्तगिर अत्तार , शहाजी रसाळ , विश्वास कदम , रमेश यादव , अविनाश चितुरकर , शफी मुल्ला ,सचिन शेटे, किशोर मुळीक , सुनील कदम आदी उपस्थित होते
           आज तहसीलदार गणेश शिंदे गटविकास अधिकारी डॉक्टर अनिल बागल पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रविण पाटील मुख्याधिकारी योगेश पाटील उपनगराध्यक्ष किर्तीकुमार पाटील बांधकाम सभापती सौ सुनिता निकम सर्व नगरसेवक यांनी भेट देऊन पहाणी केली. व सूचना दिल्या.
...........................................

Post a Comment

0 Comments