Daily Mahasatta

Daily Mahasatta

प्रशासनावर अवलंबून राहू नका, स्वतःची काळजी घ्या...


 शिवणी : येथे बापूराव फाऊंडेशनच्यावतीने गरजू लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी मारूती पवार, विकास पवार, संग्राम पडळकर.

कडेगाव ( सचिन मोहिते)
          कोरोनाच्या काळात आता केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता. नागरिकांनी आत्म सुरक्षेला देखील महत्व द्यायला हवे. जिल्ह्यात कोरोना रोगाचा विळखा वाढत चालला आहे. शासनाला याचे फारसे गांभीर्य दिसत नाही. जिल्ह्यात उपचाराला बेड कमी पडत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेऊन आत्म सुरक्षा ठेवली पाहिजे. तरच समाज सुरक्षित राहील.असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले.
           शिवणी (ता. कडेगाव) येथे कोरोना विषाणुंच्या पार्श्वभूमीवर कै. प्रा.शंकर पवार यांच्या स्मरणार्थ कै. बापूराव पवार फाऊंडेशन यांच्या वतीने अर्सेनिक अल्बम गोळ्या, मास्क वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते शंभर गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यात आले.
            देशमुख म्हणाले, कोरोना काळात आपले जसे हक्क आहेत. तशा आपल्या जबाबदाऱ्या देखील आहेत. देशाचे पंतप्रधान यांच्या पासून ते गावातील आशा सेविके पर्यंत सर्वजण आपल्यासाठी कोरोनाशी रस्त्यावर लढत आहेत. आपण प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. विनाकारण घराबाहेर पडणे टाळले पाहिजे. तोंडाला मास्क लावला पाहिजे. सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे.
           आज आपले कर्तव्य समजून कै. प्रा. शंकर पवार यांच्या स्मरणार्थ कै. बापूराव पवार फाऊंडेशन यांच्या वतीने अर्सेनिक अल्बम गोळ्या, मास्क वाटप करत रक्त दान शिबीर घेतले आहे. गरजू गोर गरिबांना अन्नधान्य वाटप केले. या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. हे सामाजिक भान आपल्या प्रत्येकाकडे येणे गरजेचे आहे, असे देशमुख यांनी सांगितले.
          याा कार्यक्रमास कृष्णत मोकळे, उदय देशमुख, संपतराव पवार, मारुती पवार, संजय पवार, नंदकुमार पवार, कृष्णत पवार, विकास पवार, संग्राम पडळकर, संदीप पवार, महेश पवार, तानाजी देशमुख, भिमाशेठ, डॉ. महेश गायकवाड,  किशोर देसाई, मनोज गायकवाड, मधुकर पवार, अशोक पवार, संभाजी पवार, कालिदास पवार, नवनाथ पवार, ऋषीकेश पवार, सुधीर आढाव, केदार पवार यांच्यासह आशा सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments