Daily Mahasatta

Daily Mahasatta

अवघ्या...दहा दिवसात पती-पत्नीचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू


: खानापूर तालुक्यावर पसरली शोककळा 

विटा, प्रतिनिधी
         खानापूर तालुक्‍यातील सर्वाधिक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून प्रख्यात असलेले वेजेगावचे आनंदरावशेठ देवकर (वय- ४३) यांचे ८ ऑगस्ट रोजी कोरोनामुळे निधन झाले होते. त्यानंतर आज अवघ्या दहा दिवसातच त्यांच्या पत्नी सुवर्णा देवकर (वय -४०) यांचे देखील कोरोनामुळे निधन झाले, त्यामुळे तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
         राज्यातच न्हवे तर देशातील गलाई व्यावसायिकांमध्ये दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून प्रख्यात असणाऱ्या आनंदराव शेठ देवकर यांचे ८ ऑगस्ट रोजी कराड येथे उपचारादरम्यान कोरोनामुळे निधन झाले. या दुःखद घटनेतून खानापूर तालुका सावरत असताना तालुक्याला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. आनंदरावजी शेठ देवकर यांच्या पत्नी सुवर्णा देवकर यांचे कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये आज पहाटे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे. 
         या दुर्दैवी घटनेमुळे केवळ देवकर कुटुंबियांवरच न्हवे तर अखंड तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. १ ऑगस्ट रोजी आनंदरावजी शेठ देवकर यांच्या पत्नी सुवर्णा देवकर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांच्यावर कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, आज गुरुवार १८ ऑगस्ट रोजी पहाटे तालुक्याला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या या अकाली निधनामुळे अखंड तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. 

Post a Comment

0 Comments