Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाड मध्ये गॅस शवदाहिनीची चाचणी


कुपवाड (प्रतिनिधी)
         सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या कुपवाड शहरातील गॅस शवदाहिनीची चाचणी आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत पार पडली.
कित्येक दिवसापासून सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील खोत यांनी कुपवाड मध्ये शवदाहिनी त्वरित सुरू करावी यासाठी आयुक्त नितीन कापडणीस याच्या कडे लेखी अर्ज करून वारंवार पाठ पुरावा करण्यात आला होता.याची दखल घेऊन मा आयुक्त यांनी कुपवाड शहरा मध्ये गॅस शवदाहिनीची बसवण्याचे काम सुरू केले होते ते आज रोजी पूर्ण झाले असून त्याची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली यावेळी आयुक्त नितीन कापडणीस ,सहाय्यक आयुक्त पराग कोडगुले ,अभियंता सतीश सावंत ,आरोग्य अधिकारी सिद्धार्थ ठोकळे व इतर कर्मचारी उपस्थीत होते व कुपवाड शहरातील गॅस ही शवदाहिनीची दोन ते तीन दिवसात कार्यान्वित करण्यात येणार आहे.. 

Post a Comment

0 Comments