Daily Mahasatta

Daily Mahasatta

केमिस्ट असोसिएशनकडून विजय पाटील यांना अनोख्या शुभेच्छा


 कडेेेगाव : महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील यांच्याहस्ते वृृृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कडेगाव केमिस्ट असोएशनचे सदस्य.

: डोंगराई मंदिर परिसरात वृक्षारोपण
: कडेगाव तालुका केमिस्ट संघटनेचा उपक्रम

कडेगाव ( सचिन मोहिते)
          महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कडेगाव तालुका केमिस्ट संघटनेच्यावतीने विजय पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून त्यांना अनोख्या पध्दतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
            कडेगाव व कडेपूरचे निसर्ग रम्य ठिकाण श्री डोंगराई मंदिर परिसर येथे अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच शेकडो नागरिक व मुले सकाळी व सायंकाळी व्यायामासाठी, फिरण्यासाठी येत असतात. सर्वाना शुद्ध ऑक्सिजन युक्त हवा मिळावी. म्हणून झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम महत्त्वाचा भाग असल्याने केमिस्ट संघटनेच्या वतीने अभिमन्यू वरुडे यांनी वृक्षारोपणचे नियोजनपूर्वक जन जागृतीसाठी प्रयत्न केले.
          डोंगराई मंदिर हे कडेगाव तालुक्याचे मिनी महाबळेश्वर समजले जाते.हे वृक्षारोपण महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आले. या लावलेल्या झाडांची देखभाल व संगोपन कडेगाव तालुक्यातील केमिस्ट बांधव करणार आहेत. यावेळी केमिस्ट संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रकाश सूर्यवंशी, समरजीत गायकवाड, अभिमन्यू वरुडे, प्रताप पंडित, अमोल वरुडे, सागर बुचडे, मंदिराचे पूजारी, सामाजिक कार्यकर्ते डी एस देशमुख उपस्थित होते.
        यावेळी बोलताना डी.एस. देशमुख म्हणाले, केमिस्ट संघटनेचा वृक्षारोपण करणे हा उपक्रम निसर्ग सौंदर्य वाढण्यासाठी उपयुक्त आहे. डोंगराई देवी परिसर हा पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाला पाहिजे. निसर्गाचे संगोपन करण्यासाठी गावातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी झाडे लावली पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments