Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोव्हीड योद्धा म्हणून लढणार्या पेठच्या आशा सेविकांना ' ग्रामस्थांचा सॅल्युट


: आरोग्यवर्धिनी केंद्र पेठ येथील महिला कोव्हीड योद्धांची टीम छायाचित्रात दिसत आहे

पेठ .( रियाज मुल्ला )
       कोरोनाचे संकटाचे ढग दिवसेंदिवस गडद होत चाललेले आहेत. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शासनाच्या बरोबरीने गावा-गावांमध्ये कार्यरत असणाऱ्या आशा स्वयंसेविकानी कोरोना विरोधात लढाई साठी २४ तास जागता पहारा ठेवला असून खरा कोरोना योद्धा या आशा सेविका व आरोग्य प्रशासनच आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत पेठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या आशा सेविकांचा सत्कार करून प्रत्येकी दोन हजार चा धनादेश देऊन गौरवण्यात आले आहे. या आशा सेविकाच घराघरंपर्यंत पोहचून प्रत्यक्ष लोकांशी संपर्क साधून माहिती गोळा करून शासनापर्यंत पोहोचवत आहेत. तसेच आरोग्य अधिकारी अर्चना कोडग व वैशाली देवापुरे या दोन महिला अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात प्रामाणिक कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे विशेष करून महिला कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत नागरिकांतून कौतुक होत आहे.
          महाविकास आघाडी सरकार व प्रशासन डोळ्यात तेल घालून कोरोना विरोधी लढाईत कर्तबगारी बजावत आहे.गाव ,वाडी, वस्ती अशा स्थरावरील प्रत्येक नागरिकांची काळजी घेत प्रत्येक घटकांपर्यंत यंत्रणा पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.कोरोनाच्या लढाईत पेठ आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असणाऱ्या ३० आशा सेविका आपला व कुटुंबाचा जीव धोक्यात घालून एक ' कोविड योद्धा ' म्हणून आपली जबाबदारी प्रामाणिक पणे पार पाडत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सरकार प्रत्येक नागरिकांच्या संपर्कात आहे. 
        आशा सेविकांच्या माध्यमातून रोजच्या रोज होत असलेल्या आरोग्याचा आढावा ,गाव वाडी वस्ती या ठिकाणचा आरोग्य स्थिती चा रिपोर्ट सरकारला समजत आहे. महिला कर्मचारी या कोरोना च्या लढाईत रात्रंदिवस काम करत आहेत.बाहेर गावाहून, गावात नवीन आलेल्या लोकांची माहिती, कुणाच्या आरोग्याविषयी तक्रारी आहेत का ? लोकांचे आरोग्य स्थिती कशी आहे याचा पाठपुरावा करून वरिष्ठ कार्यालयाकडे देण्याचे काम आशा सेविका करीत आहेत. आशा सेविकांच्या या कामाला नागरिकांतून ' सॅल्युट ' केला जात आहे, हे विशेष.
.........................................................
चौकट :-
कोव्हीड योद्धा म्हणून अभिमान वाटतो...

आरोग्य विभागाचे सर्व डॉक्टर, नर्सेस, सर्व कर्मचारी स्वतःचा व कुटुंबाचा जीव धोक्यात घालून कोरोनाचा सामना करण्याचा प्रयत्न आहेत. याबाबत सरकार सतर्क असून वरिष्ठ पातळीवरही वेळेवर सहकार्य मिळत आहे.गाव-गाड्या बाबतची दक्षता घेणे, बाबत महत्वपूर्ण जबाबदारी आमच्यावर आहे. या आपत्तीच्या काळात काम करताना आम्हाला अभिमान वाटतो.त्यामुळे मनात कसलीही भीती वाटत नाही.
           डॉ. अर्चना कोडग
            आरोग्य अधिकारी , पेठ.

Post a Comment

0 Comments