Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

ऊसाला रास्त भाव आणि करेक्ट वजन देणार : अॅड. वैभव पाटील


आळसंद : ' विराज' च्या गळीत हंगामाचा शुभारंभ करताना कारखान्याचे कार्यकारी संचालक वैभव पाटील, संचालक विशाल पाटील, उत्तम पाटणकर, राजेंद्र माने, अशोक मोरे, गोविंदराव भोसले.

विटा, प्रतिनिधी
          आळसंद येथील विराज केन्स अँड एनर्जी लिमिटेड या कारखान्याचा सन 2020 -21 या गळीत हंगामाचा मोळी पूजन करून दिमाखात शुभारंभ करण्यात आला. यावेळी कारखान्याकडून ऊसाला रास्त भाव आणि करेक्ट वजन देण्याची ग्वाही माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील यांनी दिली आहे.
           माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील म्हणाले, येणाऱ्या गळीत हंगामात विराज केन्स हे युनिट पूर्ण क्षमतेने चालवणार असून या हंगामात 1.25 लक्ष मेट्रिक टन एवढे गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी लागणारी सर्व ऊस तोड यंत्रणा सज्ज झाली आहे. तरी परिसरातील शेतकरी व सभासद यांनी आपला ऊस हा कारखान्याला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले.
           त्याचबरोबर उसाला रास्त भाव व करेक्ट वजन देऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचेही आश्वासन दिले. यावेळी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मा आमदार सदाशिवराव पाटील, कार्यकारी संचालक वैभव पाटील, संचालक विशाल पाटील, उत्तम पाटणकर, राजेंद्र माने, अशोक मोरे, गोविंदराव भोसले , अमित भोसले, संग्राम देशमुख, जनरल मॅनेजर विजय कुलकर्णी, चिफ केमिस्ट, दीपक जांभळे, दीपक पाटील, चीप अकाउंटंट हैदर शिकलगार, शेती अधिकारी रमेश शिंदे तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments