Daily Mahasatta

Daily Mahasatta

वाळवा तालुक्यात एकाच दिवसात 29 कोरोना पाॅझीटीव्ह


तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 233 वर

स्लामपूर .( सूर्यकांत शिंदे )
       प्रशासनाच्या प्रयत्नांनी कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात आणणाऱ्या वाळवा तालुक्यात आज दिवसभरात 11 गावातील 29 रुग्णांचा कोरोना तपासणी  अहवाल  पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील रुग्णांची संख्या आता २२९ वर पोहचली असल्याची माहिती तालुका अधिकारी साकेत पाटील यांनी दिली.
      इस्लामपूर शहरातील सुरवातीला पॉझिटिव्ह आलेल्या एकाच कुटुंबीयातील  24 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने धाबे दणाणले होते. वाळवा तालुक्यात एका दिवसात 29 रुग्ण अहवाल पॉझिटिव्ह आल्याची ही पहिलीच घटना असून परिस्थिती आता चिंताजनक बनत चालल्याचे चित्र आहे.
   आज केदारवाडी येथील 67,38,23,35 वर्षीय पुरुष, 62,26,28 वर्षीय महिला तसेच 3 वर्षाचा मुलगा असे एकूण 9 जण, वाटेगाव येथील 55, 36,50 ,52 वर्षीय महिला, 22, 17 वर्षीय पुरुष एकूण 6 जण पॉझिटिव्ह आले आहेत. इस्लामपूर  येथील 72 वर्षीय महिला व 45 वर्षीय पुरुष असे २, काळमवाडी येथील 74 व 50 वर्षीय पुरुष असे 2, तर रेठरे ह. येथील 27 वर्षीय महिला, नेर्ले येथील 37 वर्षीय महिला,सुरुल येथील 50 वर्षीय महिला,बागणी येथील 44 वर्षीय महिला,वाळवा येथिल 79 वर्षीय पुरुष, कुरळप येथील 29 वर्षीय पुरुष, ताकरी येथील 3 असे 29 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

 

Post a Comment

0 Comments