Daily Mahasatta

Daily Mahasatta

नमो नमो महिला मोर्चाच्या सांगली शहराध्यक्षपदी श्रीमती उषा गायकवाड


 : प्रदेश संघटन मंत्री सुर्यप्रकाशसिंह यांची घोषणा

सांगली, (राजेंद्र काळे)
         सांगली शहरातील भाजपच्या धडाडीचे नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती उषा गायकवाड यांची नमो नमो महिला मोर्चा या संघटनेच्या शहराध्यक्षपदी निवड झाली आहे. प्रदेश संघटनमंत्री सूर्यप्रकाश सिंग यांनी याबाबत नुकतीच घोषणा केली आहे.
          उषा गायकवाड यांनी सांगली महापालिकेच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. गुंठेवारी चळवळीत देखील त्यांचे काम उल्लेखनीय आहे. महिला संघटनातील कौशल्य ओळखून त्यांची नमो नमो संघटनेच्या सांगली शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
         प्रदेशाध्यक्ष सोपान उंडे-पाटील, श्रीमती अलका राजपूत- (प्रदेश महिला महासचिव), महाराषट्र प्रभारी   विजय हटवार यांच्या अनुमतीने, सूर्यप्रकाश सिंह- (प्रदेश संघटनमंत्री महाराष्ट्र,) यांनी उषा गायकवाड यांना नियुक्ती पत्र दिले आहे. नमो नमो मोर्चा (भारत) राष्ट्रीय व प्रदेश कार्यकारणीला पूर्ण विश्वास आहे की आपण नमो नमो मोर्चाची घटना, नियम, ध्येय व शिस्त राखत आपल्या पदाची कर्तव्ये योग्यरित्या पार पाडाल. नेहमी पदाची प्रतिष्ठा राखत संघटन, विस्तार मजबूत कराल असा विश्वास या पत्रात व्यक्त करण्यात आला आहे.
........................................
संघटनेचा विश्वास सार्थ ठरविणार...
         पंतप्रधान मा. नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या लोककल्याणकारी योजना शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम ही संघटना करत आहे. संघटनेने दाखविलेला विश्वास आपण सार्थ ठरवू.
              श्रीमती उषा गायकवाड
               शहराध्यक्षा, सांगली. 

Post a Comment

0 Comments