Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात आज ९९८ कोरोना पाॅझीटीव्ह


:आज ३२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

सांगली ( राजेंद्र काळे)
          सांगली जिल्ह्यात आज एकाच दिवशी ९९८ रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आज अखेरचा कोरोनाग्रस्तांचा आकडा १२ हजार ३९४ इतका झाला आहे.
        सांगली जिल्ह्यातकोरोना ग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून दररोज नवनवीन आकडे समोर येत आहेत आज सोमवार तारीख ३१ रोजी ९९८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज पर्यंतची एका दिवसातील  ही सर्वात मोठी वाढ असल्याचे समोर आले आहे. आज सांगली महापालिका क्षेत्रात २२३ रुग्णांचे कोरोनाचं अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये सांगली शहर १३८ तर मिरज शहरातील  ८५ रुग्णांचा समावेश आहे. तसेच आटपाडी- ३०, जत -२६, कडेगाव -२६, कवठेमंकाळ -९१, खानापूर -८४, मिरज- १७०, पलूस- ५१,  शिराळा- ४६, तासगाव- ८१ आणि  वाळवा -१७० इतक्या रुग्णांचा समावेश आहे.
       आजपर्यंत जिल्ह्यातील १२ हजार ३८४ रुग्णाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये ३ हजार ७५६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर सध्या ४ हजार ५४३ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. आजअखेर जिल्ह्यातील ४९५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात ३७५ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. तर आज ३२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली आहे


 

Post a Comment

0 Comments