Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिवसेनेकडून कै. सुरेशदादा शिंदे यांना श्रद्धांजली

कै. सुरेश (दादा) श्रीरंग शिंदे यांना श्रद्धांजली वाहताना आ. अनिलभाऊ बाबर, हेमंत  बाबर, भरत लेंगरे, प्रकाश बागल, फिरोज शेख, राहूल साळुंखे.विटा, प्रतिनिधी    राज्यात आणि देशात कोरोनाच्या  संकटाने भीषण रूप धारण केले आहे. आता  नागरिकांनी संयम राखून शासनाच्या नियमाचे पालन करत या संकटावर  मात करायला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार अनिलभाऊ बाबर यांनी केले आहे            मंगरूळ गावचे सुपुत्र दि. खानापूर तालुका शेतकरी सह. खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन व महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे माजी संचालक मा. सुरेश (दादा) श्रीरंग शिंदे यांचे अल्पशा  आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या प्रतिमेस खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात मा. आमदार अनिल (भाऊ) बाबर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात  आली. त्याप्रसंगी आमदार अनिलभाऊ बाबर बोलत होते.         याप्रसंगी  संघाचे चेअरमन मा. हेमंत (अण्णा) बाबर , माजी चेअरमन मा. भरत लेंगरे, संचालक  मा. तुकाराम वलेकर, मा. धनंजय चोथे, मा. उध्दव शिंदे, मा. शिरीष कुलकर्णी, फिरोज भाई शेख, मा. प्रकाश बागल, राहुल साळुंखे, व्यवस्थापक मा.वसंतराव इनामदार व संघाचे सर्व सेवक वर्ग उपस्थित होते..................................................चौकटद्राक्षबागायतदारांचा मार्गदर्शक हरपला        महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे माजी संचालक मा. सुरेश (दादा) शिंदे यांनी दुष्काळी पट्ट्यातील द्राक्ष बागायतदारांना निर्यातक्षम द्राक्षाची माहिती दिली. त्यामुळेच आज खानापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन केले जाते सुरेश दादा हे  द्राक्ष बागायतदारांचे मार्गदर्शक होते. त्यांच्या निधनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.               हेमंत बाबर,          चेअरमन, खरेदी विक्री संघ, विटा.

Post a Comment

0 Comments